Police Viral Video : आला की घाल खिशात! पोलिसांच्या वसुलीचा व्हिडीओ अंबादास दानवेंकडून ट्वीट
Police Viral Video : पोलिसांकडून कशाप्रकारे वसुली सुरु असते याचा व्हिडीओ देखील दानवे यांनी ट्वीट केला आहे.
Police Viral Video : समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) माध्यमातून राज्याच्या विकासाची समृद्धी होईल अशी अपेक्षा असताना, सध्या या महामार्गावर पोलिसांचीच (Police) समृद्धी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवून, त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत केला आहे. तर पोलिसांकडून कशाप्रकारे वसुली सुरु असते याचा व्हिडिओ (Video) देखील दानवे यांनी ट्वीट केला आहे. तर त्यांच्या याच आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांनी माध्यमांना दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. कमी वेळेत जास्त अंतर प्रवास करण्यासाठी समृद्धी महामार्ग फायद्याचा ठरेल, अशी अपेक्षा सरकारला होती. मात्र सद्या या महामार्गावर पोलिसांचीच समृद्धी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण महामार्ग पोलिसांच्या वसुलीचा व्हिडीओच समोर आला आहे. अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. “समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!..” असे दानवे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
काय आहे व्हिडीओत ?
अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत एक पोलिस एका वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घालत असल्याचे दिसत आहे. तसेच, दुसऱ्या ठिकाणी दोन पोलिस असेच करत असल्याचे दिसून आले. मोठ्या वाहनांचे चालक किंवा क्लीनर यांना खाली उतरवून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन ते खिशात घातल्याचेही यात दिसत आहे. जवळपाच चार ते पाच जणांना रोखून अशी कृती पोलिस करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांचीच समृद्धी होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
सरार्स चालते वसुली...
समृद्धी महामार्गावर सद्या मोठ्याप्रमाणावर जड वाहतूक सुरु आहे. मात्र काही महामार्ग पोलिसांकडून या गाड्यांना अडवून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढच नाही तर गाडी सोडण्यासाठी पैश्यांची मागणी देखील केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हे चित्र सुरु आहे. त्यातच आता या वसुलीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांची ही वसुली थांबवण्याची मागणी केली जात आहे.
पाहा वसुलीचा व्हिडिओ
इतर महत्वाच्या बातम्या:
Tab Scam: मंत्री संदिपान भूमरेंच्या खात्यात टॅब घोटाळा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप