एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : मोठ्या कष्टाने शिकवलं, पण मुलं संस्कारी निघाले नाहीत; हतबल बापाची फेसबुक पोस्ट करुन आत्महत्या

Chhatrapati Sambhaji Nagar : मोठ्या कष्टाने आपल्याल मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त करत या व्यक्तींनी आयुष्य संपवलं आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Suicide News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. विशेष म्हणजे 'मी आत्महत्या करत आहे' अशी फेसबुकला (Facebook) आधी पोस्ट लिहिली आणि त्यानंतर या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचललं आहे. मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिकवलं, पण ते संस्कारी निघाले नसल्याची खंत व्यक्त करत या व्यक्तीने आयुष्य संपवलं. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे (वय 50 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोठ्या कष्टाने मुलांचं शिक्षण केलं, पण मुलांची साथ मिळाली नसल्याच्या दुःखातून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत, आत्महत्या करण्याचं कारण लिहलं आहे. तर मला माफ करा मी टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील त्यात म्हटले आहे. दत्तात्रय सोरमारे हे गावातील प्रतिष्ठित नागरिक होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये?

“प्रिय मित्र आणि नातेवाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे. कारण मी तुम्हाला यानंतर कधीही भेटणार नाही. माझ्याकडे काही मित्रमंडळी यांचे पैसे आहेत, ते पैसे परत करण्याची माझी प्रामाणिक इच्छा होती. आज ना उद्या ते पैसे परत करण्याची माझी इच्छा असताना माझ्यावर असं काही प्रसंग आला आहे की, मला नाविलाजाने आत्महत्या करावी लागत आहे. कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की, मी कोणालाही तो सांगू शकत नाही. कारण माझे एक स्वप्न होती की, माझं कुटुंब ग्रॅज्युएट व्हावे. त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी आटोकाठ प्रयत्न केले. कधी मला अडचण आली तरी मी कोणाकडे तरी हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले. पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे. कारण मी सगळं काही करु शकलो, पण माझ्या मुलांना मी संस्कार देऊ शकलो नाही. त्यामुळे मी आज फाशी घेत आहे. न्यायालयाकडून शिक्षा मिळेल तेव्हा मिळेल, पण मी असा निर्णय घेतला की याची शिक्षा मला मिळायला पाहिजे. कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करुन फार मोठी चूक केलेली आहे. काही माझी हितचिंतक असतील, माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पटणार नाही. पण मित्रहो मला माफ करा हा निर्णय माझाच आहे. आणि तुम्ही मला खरंच माफ करताल असं मला वाटत नाही, तर कृपया मला माफ करावं एवढीच हात जोडून विनंती.....”

इतर महत्वाच्या बातम्या: 

आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Embed widget