आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश
Cat Sterilization: यापुढे आता भटक्या मांजरांची नसबंदी आणि लसीकरण करण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे.
Cat Sterilization: भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते. मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. कारण यापुढे आता भटक्या मांजरींच्या नसबंदी आणि लसीकरण करण्याचा निर्णय सरकराने घेतला असून, याबाबत नगरविकास विभागाने शासन परिपत्रक देखील काढले आहे. ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःहून किंवा AWBI द्वारे मान्यताप्राप्त प्राणी कल्याण संस्थेद्वारे ABC कार्यक्रमासाठी भटक्या मांजरींचे जन्म नियंत्रण आणि लसीकरण योजना राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
भटक्या मांजरांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे इत्यादींबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो त्याच धर्तीवर भटक्या मांजरांसाठी नसबंदी व शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्याकरिता सरकार विचार करत होती. मात्र अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने निर्बीजीकरण, लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी असणार कार्यपद्धत....
- स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःहून किंवा AWBI द्वारे मान्यताप्राप्त प्राणी कल्याण संस्थेद्वारे ABC कार्यक्रमासाठी भटक्या मांजरींचे जन्म नियंत्रण आणि लसीकरण योजना राबवाव्यात.
- मांजरींना सापळा लावणे उदा. बॉक्स ट्रॅप, ड्रॉप ट्रॅप, मांजरीचे पिल्लू इ. किंवा इतर कोणतीही मानवी सापळा पद्धतीचा वापर करणे.
- मांजर नसबंदी धोरण ट्रॅप-न्युटर आणि रिटर्न (TNR) च्या तत्वावर स्विकारले पाहिजे. जेव्हा मांजर अजूनही ऍनेस्थेसियाच्या प्रभावाखाली आहे, तेव्हा सर्व निर्जंतुकीकरण केलेल्या मांजरींना नसबंदीच्या वेळी ओळखीच्या कॉलरसह ठळकपणे ओळखले जाणे आवश्यक आहे.
- कोणत्याही मांजरीचे वय सहा महिने पूर्ण होण्याआधी किंवा परिपक्वता पूर्ण होण्याआधी त्याला स्पे किंवा न्यूटरिंग करू नये.
- कोणत्याही मादी गरोदर मांजरीचा (गर्भधारणेच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून) गर्भपात करू नये आणि त्यांची पिल्ले जन्माला येईपर्यंत स्पेइंग करू नये.
- स्पेय किंवा न्यूटर्ड मांजरींना सोडण्यापूर्वी लसीकरण केले जावे आणि मांजरीच्या कॉलरने किंवा कानात टॅटू करून त्यांना निर्जंतुकीकरण किंवा लसीकरण केलेल्या मांजरी म्हणून ओळखले जावे. मांजरांना ओळखण्यासाठी टोकन किंवा नायलॉन कॉलर असलेल्या अशा मांजरींच्या तपशीलवार नोंदी ठेवल्या जातील. मांजरींच्या ब्रॅंडिंगला परवानगी दिली जाणार नाही.
- भटक्या मांजरीला पकडण्यासाठी आणि सोडण्याच्या संदर्भात विशिष्ट रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: