एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगरमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढले; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar : सणासुदीच्या काळात शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठ रंगार गल्ली, पैठणगेट, सिटी चौक, औरंगपुरा या परिसरात कारवाई करण्यात आली आहे. शहरात साजऱ्या होणाऱ्या 14 एप्रिल, गुड फ्रायडे, हनुमान जयंती उत्सव व रमजान ईदच्या निमित्ताने सणासुदीच्या काळात शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. या गर्दीच्या ठिकाणी काही दुकानदारांनी आणि हातगाडी धारकांनी केलेले अतिक्रमण आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने मोहीम राबवून काढण्यात आला आणि रस्ता मोकळा करण्यात आला.

हातगाडी चालक व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर हात गाडी लावून रस्त्यावर व्यापार करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच आणि व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर लावल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याने आपसात तणाव होतो. यामुळे अनकेदा भांडण देखील होतात. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत आज सकाळी कारवाई करण्यात आली. प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार मा. अतिरिक्त आयुक्त-2 यांचे सोबत सोमवारी स्थळ पाहणी करुन संबंधित अतिक्रमण धारकांना सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आज पुन्हा त्यांनी अतिक्रमण केल्याने पैठण गेट, रंगार गल्ली, सिटी चौक  या परिसरात कारवाई करण्यात आली. 

'या' भागात देखील केली कारवाई...

यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत पैठण गेट ते सब्जी मंडी या रस्त्यावर चार फळ आणि फूल झाडे विक्रेते दुकानांना तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यांच्यावर सोमवारी कारवाई होणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने टीव्ही सेंटरच्या एम-2 परिसरातून चारचाकी वाहने, हातगाड्याचे अतिक्रमण काढले. तर शरद हॉटेल ते जिजाऊ चौक जयस्वाल हॉल पर्यंत पाहणी करून रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणधारकांना मार्किंग करुन दिली आहे. तसेच या ठिकाणी गुरुवारी सकाळी कारवाई होणार आहे.

यांनी केली कारवाई...

ही कारवाई प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त-2 तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे इमारत, निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, यांच्या पथकाने कारवाई केली अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
Embed widget