एक्स्प्लोर

पावसाने पाठ फिरवली, 40 दिवसांत 7 शेतकऱ्यांची आत्महत्या; औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील परिस्थिती

Aurangabad Farmer suicide : पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यात विदारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Aurangabad Farmer suicide : राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे यावर्षी बळीराजाची चिंता वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पिकं माना टाकत आहे. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी आता आत्महत्या (Farmer suicide) सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पिकांची झालेली केविलवानी अवस्था त्यात कर्जाचा डोंगर या व्यथेने चिंतातून झालेल्या सात शेतकऱ्यांनी गेल्या चाळीस दिवसांत मृत्यूला कवटाळले असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यात विदारक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

सोयगाव तालुक्यात जुलै 2023 ते 7 ऑगस्ट या कालावधीत सात कर्जबाजारी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची बिकट अवस्था व कर्जाचा वाढता डोंगर पाहून आत्महत्या केल्या आहे. यात गंगाबाई जाधव (वय 55 वर्षे, रा. तिडका), सोनुबा कळवतरे (रा. सोयगाव), अतुल देसाई (रा. सोयगाव) आणि जोरसिंग राठोड या चार शेतकऱ्यांचे शासकीय मदतीसाठी सदोष प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित तीन प्रस्तावात त्रुटी असल्याने अद्याप मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले नाही.

सोयगाव तालुक्यात सुरवातीला झालेल्या पावसानंतर अपेक्षित पाऊस झालाच नाही. जुलै महिन्यात आत्तापर्यंत 274.4 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच 144.8 टक्के पाऊस जुलै महिन्यात झाला. तर, ऑगस्ट महिन्यात 32.8 मिमी म्हणजेच 31.7 टक्के पाऊस झाला आहे. तसेच जुन ते 15 ऑगस्टपर्यंत 346.1 मिमी पाऊस झाला असून, म्हणजेच 79.6 टक्के पाऊस झाला आहे. तर, सोयगाव तालुक्यात यंदाही कपाशीच्या पिकांची विक्रमी 39 हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. मात्र, रोगांच्या विळख्यात कपाशीची पिके अडकली आहेत. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अनेक शेतकरी कपाशीचे पीक उपटून फेकत आहे. 

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट! 

राज्यात अपेक्षित पाऊस झाले नसून, राज्यभरात मागील वर्षी आजच्या तारखेत 79.63% पाणीसाठा होता. यावर्षी मात्र अवघा 61.16 टक्केपाणीसाठा आहे. तर मराठवाड्यामध्ये अवघा 31.70 टक्के सरासरी पाणीसाठा आतापर्यंत उपलब्ध आहे. त्यात आता पावसाचा फक्त दीड महिना उरला आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maharashtra Rainfall Update : राज्यावर दुष्काळाचं सावट? मराठवाड्याला बसणार सर्वाधिक झळा; पाहा राज्यभरातील परिस्थिती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election : कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
Delhi Election : माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
माजी सीएम अरविंद केजरीवालांह आपच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही  जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVEABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDelhi Result 2025 : 'आप'चा गड ढासळला! केजरीवालाचं नेमकं काय चुकलं? Rajiv Khandekar यांचं विशलेष्णDelhi Result 2025 : 'आप'चा गड ढासळला! केजरीवालाचं नेमकं काय चुकलं? Rajiv Khandekar यांचं विशलेष्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Election : कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या सोडून शत्रुत्व स्वीकारले, या सर्वांची हत्या एका स्वार्थी, चारित्र्यहीन माणसाने वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी केली; केजरीवालांवर माजी सहकाऱ्याची विखारी टीका
Delhi Election : माजी सीएम अरविंद केजरीवालांच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
माजी सीएम अरविंद केजरीवालांह आपच्या झाडूच्या काड्या पार इस्कटल्या, पण सीएम आतिशींनी पक्षाची लाज राखली
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
दिल्लीच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एक है तो सेफ है चे दुसरे उदाहरण दिल्ली
Nashik Crime : मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
मुख्याध्यापकाचा सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना
Iltija Mufti : इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
इकडं सकासकाळी ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले अन् तिकडं मेहबुबा मुफ्तींच्या लेकीचा गंभीर आरोप; म्हणाली, 'आमच्या दरवाजावर...'
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
Pune News : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन लेकरांना पहाटेच्या साखर झोपेत गळा दाबून मारले, नवऱ्यावरही कोयत्याने वार; पुणे जिल्ह्यातील थरकाप
Embed widget