एक्स्प्लोर

कोणी ओढणी ओढत होतं, तर कोणी मोबाईल हिसकावत होता; टोळक्याकडून तरुणीची भर रस्त्यात छेडछाड

Chhatrapati Sambhaji Nagar: घटनेची गंभीरता लक्षात घेता स्वतः पोलिसांकडून सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar News) कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडालेले आहेत. ना कुणाला कायद्याची भीती आहे ना पोलिसांच्या कारवाईची. त्यातच आणखी एक धक्कादायक घटना शहरात समोर आली आहे. एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर धर्माच्या मुलासोबत फिरते या संशयावरुन तरुणांच्या टोळक्याने मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास दिला. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला. मात्र मुलीने आणि घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलिसांकडून सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी आपल्या एका मित्रासोबतल बिबी-का-मकबरा पाहण्यासाठी आली होती. मात्र एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर समाजाच्या मुलासोबत फिरत असल्याचे म्हणत, तरुणांचं टोळकं तिथे जमा झालं. यावेळी त्यांना पाहून मुलाने तिथून पळ काढला. मात्र उपस्थित असलेल्या मुलीला या टोळक्याने घेरलं. तिला शिवीगाळ करु लागले, कोणी तिचा स्कार्फ ओढत होता, तर कोणी तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. मुलगी जोरजोरात ओरडत होती. मला सोडा अशी विनवणी करत होती. पण जातीचं भूत डोक्यात घुसलेल्या या टोळक्याला कसलाही फरक पडत नव्हता. दरम्यान या सर्व घटनेनंतर मुलीने आणि तिच्या घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. पण घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पोलिसांकडून सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 

तीन आरोपींना अटक...

छत्रपती संभाजीनगर शहरातील या घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या मुलीला टोळक्याकडून त्रास देण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी व्हिडीओमधील टोळक्याची ओळख पटवली आहे. आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील तपास बेगमपुरा पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

व्हिडीओ व्हायरल... 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा भागात एका मुलीला अडवून टोळक्याकडून त्रास दिला जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका विशिष्ट धर्माच्या मुलीला काही तरुण अडवून, तुझ्यासोबत असलेला मुलगा कोण होता अशी विचारणा करा, तिची छेड काढताना पाहायला मिळत आहेत. तसेच काही जण तिचा व्हिडीओ तयार करत होते. तिची बॅग ओढण्याचा प्रयत्न करत होते. तर काहींनी तिचा मोबाईल हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे भर रस्त्यात हा प्रकार सुरु असताना या मुलीच्या बचावासाठी कोणीही पुढे आलं नाही.

इतर महत्वाच्या बातम्या:

संभाजीनगरमधील राड्यात पोलिसांचे वाहने जाळण्यात सर्वात पुढे असणाऱ्या दोघांना बेड्या, आतापर्यंत 81 जण अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Embed widget