एक्स्प्लोर

काय सांगता! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण तालुका उपोषणावर; औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आंदोलन

Maratha Reservation : तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण हे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आजपासून तीन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण हे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता गावागावात पाहायला मिळत आहे. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत समोर आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. या उपोषणात गावातील तरुण, वृद्ध आणि महिला सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण थांबून त्याच ठिकाणी अमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या

  • जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत असलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले. त्याचा गंगापूर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत. तसेच, आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याऐवजी तात्काळ निलंबणाची कारवाई करण्यात यावी.
  • मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजप आघाडीचेच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढून निर्णय घेण्यात यावा. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण सांगून समाजाची फसवणूक करू नये.
  • मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगाव आंदोलनासह, आंतरवली सराटी आणि राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

बंदला जिल्हाभरात प्रतिसाद

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तर काही ठिकाणी साखळी उपोषणसुद्धा करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी गावात, तोडगा निघणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar & Chhagan Bhujbal : चार दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
चार दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Ambadas Danve: 'तुमचे चरण्याचे धंदे बंद करा 'तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल,म्हणाले ..
'तूप चाटून काय भूक जात नसते'..तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Ajit Pawar : अजित पवारांकडून नाराजी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत?Vicky Kaushal At Grishneshwar Temple : विकी कौशलकडून घृष्णेश्वर मंदिरात विधीत पूजा, माझावर EXCLUSIVEDhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णयDwarkanath sanzgiri Demise : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar & Chhagan Bhujbal : चार दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
चार दिवसांपूर्वी अजितदादांचा फोन; नाराजीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, दोघांमध्ये काय बोलणं झालं?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी
Ambadas Danve: 'तुमचे चरण्याचे धंदे बंद करा 'तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल,म्हणाले ..
'तूप चाटून काय भूक जात नसते'..तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले..
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
'ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही, त्यांनी..'; अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली
Nashik Crime : नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने सपासप वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार
Akshay Shinde Encounter : मोठी बातमी : आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका; कोर्टात नेमकं काय घडलं?
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
करुणा शर्मांना 2 लाख पोटगी, कोर्टाच्या निर्णयावर धनंजय मुंडेंकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'लिव्ह इन रिलेशनशीप'
Embed widget