एक्स्प्लोर

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी गावात, तोडगा निघणार का?

Maratha Reservation : आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. तर, मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीमुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, आरक्षणाचा जीआर आल्याशिवाय आपण उपोषणावर कायम असणार असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज (05 सप्टेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि उदयनराजे भोसले यांचे शिष्टमंडळ जाणार आहे. यापूर्वी देखील एकदा गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे.  

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. आज या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान, उपोषणस्थळी दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून अमानुषपणे लाठी हल्ला करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.  या घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. तर, मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच राज्यभरात या उपोषणाला मोठा पाठींबा मिळत आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन आणि बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

राज्यभरात आंदोलन... 

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी राज्यभरात सकल मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज देखील कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक दिली गेली आहे. ठिकठिकाणी होणारे रस्ता रोको आणि एसटी बसची तोडफोड लक्षात घेता मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला असल्याचे चित्र आहे.

जालन्यातही आंदोलनं सुरूच...

अंतरवाली सराटी गावात झालेल्या पोलिसांच्या लाठी मारच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील अनेक भागात असेच आंदोलन पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर अनेक गावांनी अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Bacchu Kadu : ...नाहीतर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही; बच्चू कडू थेटच म्हणाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget