APMC Election 2023: वैजापूर बाजार समिती भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; आमदार बोरनारेंनी बाजी मारली
APMC Election 2023 Result : वैजापूर बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना स्पष्ट बहुमत पाहायला मिळत आहे.
APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) बाजार समितीप्रमाणेच जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Vaijapur Market Committee Election) देखील भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार रमेश बोरनारे यांची प्रतिष्ठा असलेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेनेनं आपली सत्ता काबीज केलीय. भाजप-शिवसेना युतीला 11 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे वैजापूर बाजार समितिवर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना स्पष्ट बहुमत पाहायला मिळत आहे.
विजयी उमेदवार
महाविकास आघाडीचे उमेदवार
- अविनाश गलांडे (म वि आ)
- संजय निकम (म वि आ)
- ज्ञानेश्वर जगताप (म वि आ)
- अनिता वाणी (म वि आ)
- प्रशांत सदाफळ (म वि आ)
- ठोंबरे विजय विश्राम (म वि आ)
- शेख रियाज अकिल (म वि आ)
भाजप-शिंदे गटाचे उमेदवार
- रामहरी बापू (सेना बिजेपी)
- काकासाहेब पाटील (सेना बिजेपी)
- कल्याण दागोडे (सेना बिजेपी)
- कल्याण जगताप (सेना बिजेपी)
- शिवकन्या पवार (सेना बिजेपी)
- नजन रजनीकांत (सेना बिजेपी)
- इंगळे गणेश पोपटराव (सेना बिजेपी)
- पवार प्रवीण लक्ष्मण(सेना बिजेपी)
- आहेर गोरख प्रल्हाद (सेना बिजेपी)
- त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (सेना बिजेपी)
- गायकवाड बाबासाहेब दगु (सेना बिजेपी)
बाजार समिती माहिती...
- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा पिकासाठी ओळखली जाते.
- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक उलाढाल अंदाजे 3 कोटी 47 लाख आहे.
- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप युतीच्या बळिराजा सहकारी विकास पॅनल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडी युतीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत झाली.
शिवसेना शिंदे गट, भाजप पॅनलचे उमेदवार
सहकार संस्था मतदार संघ: कल्याण दांगोडे, धनंजय धोर्डे, काकासाहेब पाटील, भागिनाथ मगर, रामहरी जाधव, कल्याण जगताप, शिवाजी गोरे, शिवकन्या पवार, अलकाबाई वैद्य, अरुण पवार, रजनीकांत नजन. ग्रामपंचायत मतदार संघ: गणेश इंगळे, प्रवीण पवार, गोरख आहेर, प्रशांत त्रिभुवन, व्यापारी मतदार संघ : सुरेश तांबे, पारस बोहरा हमाल तोलारी मतदार संघ : बद्रिनाथ गायकवाड.
युतीच्या शेतकरी विकास पॅनल उमेदवार
सहकारी संस्था मतदार संघ: संजय निकम, अविनाश गलांडे, रिखब पाटणी, ज्ञानेश्वर जगताप, कचरू डिके, बाळासाहेब भोसले, जगन्नाथ जाधव, अनिता वाणी, द्वारका पवार, प्रशांत सदाफळ, काशिनाथ भालेकर. ग्रामपंचायत मतदारसंघ: उत्तम निकम, अशोक चव्हाण, अमृत शिंदे, यशवंत पडवळ व्यापारी मतदारसंघ: विजय ठोंबरे, शेख रियाज शेख आकील हमाल तोलारी मतदारसंघ : रवींद्र पगारे
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला मोठा धक्का