एक्स्प्लोर

आधी म्हणाले प्रचार करणार नाही?, आता पेढे घेऊन दानवे थेट खैरेंच्या घरी पोहचले

Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. कारण अंबादास दानवे काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगरमधील डेक्कन निवासस्थानी पोहोचले असून, खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खैरे असा वाद पाहायला मिळत होता. दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात आपण पक्षाचं काम करू, खैरे यांचे काम करणार नसल्याचं दानवे म्हणाले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद कायम असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज अंबादास दानवे यांनी खैरेंची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दानवेंनी खैरे यांना शाल आणि बुके भेट देऊन पेढाही भरवला. त्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद संपला असल्याचं पाहायला मिळत आहे.

अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे वाद काय आहे?

  • अंबादास दानवे हे छत्रपती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी 2014 पासून इच्छुक असून, प्रत्येकवेळी त्यांना डावलले जाते.
  • चंद्रकांत खैरे यांच्याकडून एकाच पक्षात असतांनाही सतत आपल्याला डावलण्यात येत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता.
  • चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा पक्षातील वाद प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळत असतो.
  • अंबादास दानवे यांच्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे देखील अनेकदा चंद्रकांत खैरेंनी बोलावून दाखवले आहे.
  • चंद्रकांत खैरे यांनी मागील आठवड्यात प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन केले, मात्र यावेळी दानवे यांना बोलावले नसल्याने हा वाद आणखीनच वाढला होता.
  • खैरे यांच्या उमेदवारीला आव्हान देत अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
  • छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्यातील वाद एवढा वाढला होता की, थेट उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करावी लागली.
  • विशेष म्हणजे खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर आपण फक्त पक्षाचे काम करू, खैरे यांचे काम करणार नसल्याचे काहीरे म्हणाले होते.
  • चंद्रकांत खैरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर अंबादास दानवेंनी सूचक व्हाट्सअप स्टेटस ठेवत आपली नाराजी जाहीर केली होती.
  • मात्र आता हा वाद संपवत अंबादास दानवे यांनी आज खैरेंची भेट घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी : मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही तर...., अंबादास दानवेंचं खळबळजनक वक्तव्य!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget