![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: Poll of Polls)
'मिस्टर..., भगोडा तर कासीम रझवी'; सावरकरांवर बोलणाऱ्या इम्तियाज जलीलांवर दानवेंची टीका
Imtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भगोड़े असल्याचे वक्तव्य परभणी जिल्ह्य़ातील पूर्णा येथे केले आहे.
!['मिस्टर..., भगोडा तर कासीम रझवी'; सावरकरांवर बोलणाऱ्या इम्तियाज जलीलांवर दानवेंची टीका Ambadas Danve criticism Imtiyaz Jaleel after criticizing Veer Savarkar Chhatrapati Sambhaji Nagar marathi news 'मिस्टर..., भगोडा तर कासीम रझवी'; सावरकरांवर बोलणाऱ्या इम्तियाज जलीलांवर दानवेंची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/069c782da6883b6376e5253ef8c0a6301706512764375737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर : वीर सावरकर (Veer Savarkar) पळपुटे होते आणि त्यांना कधीच महापुरुष मानणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी निशाणा साधला आहे. "मिस्टर जलील, भगोडा तर तो आहे रझाकारांचा म्होरक्या कासीम रझवी. ज्याला 'ऑपरेशन पोलो' मध्ये सैन्याने पळवून पळवून पिटाळले होते, अशा शब्दांत दानवेंनी जलील यांना प्रत्युत्तर दिले आहेत.
खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भगोड़े असल्याचे वक्तव्य परभणी जिल्ह्य़ातील पूर्णा येथे केले. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून, त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्या भारत भूमीचे महान सुपुत्र असून, आपल्या जिगरचा तुकडा पाकिस्तानला पळून गेल्याचे म्हणत दानवेंनी जलील यांच्यावर टीका केली आहे.
काही लोकांचा 'जिगर का तुकडा' पाकिस्तानला पळाला
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, मिस्टर जलील, भगोडा तर तो आहे रझाकारांचा म्होरक्या कासीम रझवी. ज्याला 'ऑपरेशन पोलो' मध्ये सैन्याने पळवून पळवून पिटाळले होते. यानंतर हा काही लोकांचा 'जिगर का तुकडा' पाकिस्तानला पळाला. सावरकरांनी तर याच देशात आपला देह ठेवला हे ध्यानी असू द्या!...कासीम रझवी सारखी लोकांची कत्तल उडवून पाकिस्तानात जाऊन आयुष्य घालवण्यात त्यांनी धन्यता नाही मानली, असे दानवे म्हणाले.
काय म्हणाले होते जलील?
देशात सगळ्यात मोठा कोणी महापुरुष असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे असं असदुद्दीन ओवैसी संसदेत म्हणाले होते. विशेष म्हणजे ओवैसी हे एकटे असे खासदार आहेत, ज्यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर खासदारांच्या समोर उभं राहून हे वक्तव्य केले होते. मात्र, याचा त्यांना खूप त्रास झाला. कारण ते म्हणतात की, त्यांच्या नजरेत सावरकर महापुरुष आहेत. मात्र, अशा पळपुट्यांना आम्ही कधीच महापुरुष मानलं नाही आणि मानणार देखील नाही, असे जलील म्हणाले.
राजकीय वातावरण तापणार...
सावरकर यांच्यावरून यापूर्वी देखील अनेकदा राजकारण झाले आहे. अशात आता जलील यांनी सावरकर यांचा उल्लेख पळपुटे असा केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच, जलील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे. याची सुरवात देखील झाली असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी जलील यांच्यावर टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiaz Jaleel : सावरकर पळपुटे, त्यांना कधीच महापुरुष मानणार नाही; जलील यांचं वादग्रस्त वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)