शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या घरात सापडला काडतुसांचा साठा, चंद्रपुरात पोलिसांची मोठी कारवाई
चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या (Chandrapur Shivsena Thackeray Group) युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे.
Chandrapur News : चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या (Chandrapur Shivsena Thackeray Group) युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा साठा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे (Vikrant Sahare) यांच्या घरी पोलीस पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 40 काडतुसे सापडली आहेत. चंद्रपूर शहरातील शहरातील इंदिरानगर भागातील घरात 4 तास पोलिसांनी शोध अभियान राबवलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातील गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.
गेल्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळं पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील सहारे यांच्या घरात 4 तास शोध अभियान राबवले. चंद्रपूर जिल्ह्यात गेले काही दिवस गोळीबारांच्या घटनात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विक्रांत सहारे याच्या घरावर धाड घातली. धाडीत 40 काडतुसांसह एक तलवार, 1 मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. सहारे यांच्यासह चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक 2 तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी सुरु
विक्रांत सहारे व कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरातच हा काडतुसांचा साठा सापडल्यानं चंद्रपूरमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसांचा साठा घरात कसा आला? असा सवाल देखील अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या काडतुसाच्या साठ्यासंदर्भात सविस्तर माहिती समोर येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Chandrapur Crime: चंद्रपूर पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं! बल्लारपूर शहरात गोळीबारानंतर फोडले पेट्रोल बॉम्ब, नेमकं प्रकरण काय?