एक्स्प्लोर

Chandrapur Crime News : युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडली होती घटना

Chandrapur News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत.

चंद्रपूर : चंद्रपुरात (Chandrapur) शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही संशयित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे.  स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहे. सोबतच या हत्येमागील नेमके कारण काय, याचा देखील पोलीस तपास करत आहे. 

संशयित आरोपींना घेतले ताब्यात 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख शिवा वझकर यांच्या झालेल्या हत्येच्या घटनेने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली. तसेच त्यांचा मृतदेह एका मित्राच्या  कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. त्याचवेळी वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि वाहनांची तोडफोड केल्याने हे प्रकरण अधिक चिघळण्याचे संकेत पोलिसांना मिळाले. परिणामी पोलिसांनी या घटनेनंतर शहरातील अधिक बंदोबस्त वाढवत योग्य त्या उपाययोजना केल्या. त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच वझकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट 

घटनेनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मित्रासोबत झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या प्रकरणातील 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस या तिघांची कसून चौकशी करत असून या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत. 

गोंदियामध्ये तरुणाची हत्या

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना काल 23 जानेवारीच्या मध्यरात्री घडली. बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे घडली होती. ज्यामध्ये चहाच्या टपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले होते.

आणखी वाचा 

Mission Yuva Award : निवडणूक आयोगाचा मिशन युवा पुरस्कार नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना प्रदान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget