एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार? सुत्रांची माहिती; आजच्या पुण्यातील बैठकीलाही जाणार नाहीत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात (Pune) आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे..

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Saghtana) पुण्यात (Pune) आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जाणार नाहीत. अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला ही माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

परवापासून रविकांत तुपकर नॉट रिचेबल 

रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय...? असा सवाल उपस्थित होतोय. मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. परवापासून नॉट रिचेबल असलेले रविकांत तुपकर लवकरच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता

रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याला खुद्द रविकांत तुपकर यांनी दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

तुपकरांनी भाजपमध्ये यावं, आशिष देशमुखांनी दिली ऑफर

भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं असं म्हटलं होतं.  विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी भाजप कमालीची कामं करणारा पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असं देशमुखांनी म्हटलंय. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यमान नेतृत्वार थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बहुजन समाजाचा स्वाभिमान दुखावला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याचे आशिष देशमुख म्हणाले. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देशमुख यांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ravikant Tupkar : भाजपच्या कोणत्याही नेत्याचा मला फोन नाही, आशिष देशमुखांच्या वक्तव्यानंतर रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget