धक्कादायक! शेगावमध्ये एस.टी.आगाराचा कारभार प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर, प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यावर आगार सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र 'एबीपी माझा'च्या कॅमेरात कैद झाले आहे. याबाबत आगार व्यवस्थापक मात्र काहीही बोलायला तयार नाहीत.
बुलढाणा: शेगाव राज्य परिवहन मंडळाच्या (ST Mahamandal) आगारात प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र समोर आल आहे. संपूर्ण एस. टी. बस आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थी चालवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. यामुळे मात्र प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे.
एस.टी.आगारात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रात्र पाळीत काम करण्यास नियमानुसार मनाई असताना शेगाव आगारात मात्र रात्रपाळीत संपूर्ण प्रशिक्षणार्थी विद्यार्थी बसची दुरुस्ती करताना दिसून येत आहेत. मात्र कायमस्वरूपी असलेले मेकॅनिक दांडी मारून संपूर्ण आगार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यावर सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचं चित्र 'एबीपी माझा'च्या कॅमेरात कैद झाले आहे. याबाबत आगार व्यवस्थापक मात्र काहीही बोलायला तयार नाहीत.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरवशावर आगराचा कारभार
प्रशिक्षणार्थी दुरुस्त करत असलेल्या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. कधी बसचे चाक निखळून पडत आहे तर कधी बसेस रस्त्यात नादुरुस्त होत असल्याच चित्र असताना प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या भरवशावर आगराचा कारभार सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र प्रवाशांची सुरक्षा यामुळे धोक्यात आल्याचे चित्र आहे.
शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान 'या' सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक असते
- आगार पातळीवर शिकाऊ उमेदवारांचे हजेरी पत्रक, रजा आदेश, नियमित तयार करण्यात यावे.
- शिकाऊ उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत बिघाड दुरुस्तीसाठी तसेच वाहनाच्या दुरुस्तीसाठी आगाराबाहेर पाठवू नये
- शिकाऊ उमेदवार यांच्या कामाची वेळ प्रथम पाळी (म्हणजे सकाळच्या दरम्यान) ठेवण्यात यावी
- शिकाऊ उमेदवार याना कोणतेही वाहन चालविण्याची परवानगी नसून त्यांना आगार पातळीवरील कोणतेही वाहन चालू देऊ नये.
- शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण घेत असताना यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व काळजी घेण्यात यावी. तसेच सदर शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण घेताना त्यांचा अपघात किंवा इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी.
- प्रशिक्षणादरम्यान एखादया शिकाऊ उमेदवारा अपघात किंवा त्याला इजा झाल्यास त्याची तातडीने माहिती घ्यावी. तसेच विभागीय कार्यशाळेस माहिती द्यावी
प्रवाशांच्या जीवाशी खेळ नको
वर्कशॉपमध्ये प्रशिक्षार्ती मॅकेनिककडून महामंडळ नियमबाह्य पद्धतीने एसटी कम कर असून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व महाविकास सरकारने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ करू नये अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या लोकांना प्रशिक्षण नाही त्यांच्याद्वारे एसटी चा कारभाप चालवला जात आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर याला कोण जबाबदार राहणार अशी विचारणाही करण्यात यत आहे.
हे ही वाचा :