एक्स्प्लोर

Buldhana News: एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही, माझा हिशोब बाकी; संजय गायकवाडांचा इशारा

Buldhana News: आमदार संजय गायकवाड हे 40-50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरात पोहचले. मेहकरच्या ठाणेदाराला झापझाप झापलं. पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे, असा इशाराही दिला.

Maharashtra Buldhana News: बुलढाण्यातील (Buldhana) मेहकर (Mehkar) शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही समाजकंटकांनी धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली, तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी, काठी, दगडांनी मारहाण केली. घरात घुसून सामानाची तोडफोड केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, आमदार संजय गायकवाड हे 40-50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरात पोहचले. मेहकरच्या ठाणेदाराला झापझाप झापलं. पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांचा जामीन झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. 

नेमकं काय घडलं? 

मेहकर शहरातील मोळा रोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 43 वर्षीय नेहाताई काटकर यांच्या तक्रारीवरून 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नेहाताई काटकर या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गल्लीतील महिलांसह मंदिरात दर्शनासाठी जात असताना 20 ते 25 जणांचं टोळकं हातात लाठ्या काठ्या घेऊन महिलांना आडवं आलं. त्यातील 15 वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली. सौ. काटकर यांच्या अंगावरील 1 तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले. 

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय? 

यावेळी तक्रारदार सौ. काटकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केला, तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत आला. यावेळी टोळक्यानं त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. यावेळी काटकर त्यांच्या घरात गेल्या असता गुंडांनी घरात घुसून सामानाची नासधूस केली, तोडफोड केली, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.  

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरात पोहचले. यावेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. "हा वाद धार्मिक कारणावरून आहे, मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता?" असल्या कारणांमुळे वाद झाल्याचं आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांना जामीन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही.", असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget