एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg Accident News: लोकार्पणाच्या पाच दिवसांतच समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू; एकट्या बुलढाण्यात आतापर्यंत पाच अपघात

Samruddhi Mahamarg Accident News: लोकार्पणाच्या पाच दिवसांत समृद्धीवर अपघातांची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. बुलढाण्यात आतापर्यंत पाच अपघात. सुदैवाने जीवित हानी, अपघातांच्या कारणांचा शोध सुरू.

Samruddhi Mahamarg Accident News: नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पाहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाला जेमतेम पाच दिवस उलटून गेले आहेत. या महामार्गावरून  वाहतूक सुरूही झाली. या पाचच दिवसांत या महामार्गावर एकट्या बुलढाण्यात पाच अपघात झालेत. सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी होणारे हे अपघात मात्र चिंतेची बाब असल्याचं समोर येत आहे. नेमके हे अपघात का होतायत? अपघाताची नेमकी कारणं काय आहेत? याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. 

विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात समृद्धी येईल, असं म्हंटलं जात होतं. पण गेल्या रविवारी या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 510 किमीच्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. या महामार्गावरून वाहतूक सुरूही झाली. खरं तर या महामार्गाची रचना 150 किमी प्रतितास या वेगानं वाहनं धावू शकतील, अशी तयार करण्यात आली आहे. पण याठिकाणी 120 किमी प्रतितासाची वेग मर्यादा असल्यानं यावर फक्त याच वेगात वाहनं चालविण्याची मुभा आहे. अतिशय सरळ रेषेत हा महामार्ग असल्यानं आणि गुळगुळीत रचना असल्यामुळे वाहन चालकाला आपण निर्धारित वेग मर्यादेच्या पलीकडे गेलोय, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे या महामार्गावर गेल्या पाच दिवसात अनेक अपघात झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या पाच दिवसांत फक्त बुलढाण्यातच पाच अपघात झाले आहेत. 

कधी आणि कसे झाले अपघात? 

12 डिसेंबर : एक मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन मेहकरजवळ महामार्गावरील कठड्यावर आदळून पलटी झाला, चालक जखमी.
12 डिसेंबर : एक गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन महामार्गाच्या खाली 20 फूट खोल खड्ड्यात पालटला, चालक आणि वाहक जखमी.
15 डिसेंबर : रात्री एक कार शिर्डीहून अमरावती कडे जात असताना चालकाला झोप लागल्याने कठड्याला धडकून अपघात, 11 महिन्याच्या बाळांसह तिघे गंभीर जखमी.
16 डिसेंबर : एक कार औरंगाबादहुन मेहकरकडे जाताना रस्त्यावर अचानक कोल्हा आला आणि कार अनियंत्रित होऊन अपघात झाला, दोन गंभीर जखमी, एकजण किरकोळ जखमी.
16 डिसेंबर : मुंबईहून एक कार वर्धा कडे जाताना मेहकर नजीक चालकाला झोप आल्याने कार कठड्याला धडकून अपघात , चालक गंभीर जखमी.

नेमके हे अपघात का होतायत? 

समृद्धी महामार्ग सरळ रेषेत असल्यानं आणि वाहन चालवताना वाहन चालकाला 'रोड हिप्नॉसिस' म्हणजेच, तंद्री लागण्याची अवस्था निर्माण झाल्यानं चालकाला आपण किती वेगात जातोय, याचं भान राहत नसल्यानं अचानक झोप किंवा डुलकी लागू शकते. असे प्रकार या महामार्गाच्या रचनेमुळे होत आहेत. शिवाय अचानक महामार्गावर जंगली प्राणी येणं आणि त्यामुळे वाहनावरचं नियंत्रण सुटणं. यासारख्या अनेक कारणानं महामार्गावर अपघात होत आहेत. 

खरं तर समृद्धी महामार्ग खुला करण्याआधी या मार्गावरून वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांची जनजागृती करणं आवश्यक होतं. कारण हा महामार्ग जागतिक दर्जाचं तंत्र वापरून तयार करण्यात आलं आहे. आपल्या देशातील वाहनं अशा मार्गावरून आणि अतिशय वेगानं धावण्यास समर्थ आहेत का? वाहनांची बनावट एरोडायनामीक पद्धतीनं आहेत का? एकंदरीतच वाहनांची टायरची परिस्थिती, त्यातील हवेचा दाब किती आणि कसा ठेवायचा? याबाबतीत अजूनही आपल्या देशातील वाहन चालकांमध्ये पाहिजे तशी जागृती झालेली नाही. त्यामुळे यापुढे समृद्धी महामार्गावरून वाहन चालवतानाच काहीअंशी जनजागृती करणं महत्त्वाचं राहील. 

समृद्धीवरून सुसाट वेगात वाहनं धावताना पाच दिवसांत पाच अपघात झाले. तरी मात्र सुदैवानं अपघातात जीवितहानी, मात्र झाली नाही तरीही आवरा वेगाला, सावरा जीवाला, असं काहीसं म्हणून वाहने चालविणे आवश्यक आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget