Crime News : निर्घृण हत्याकांडाला एक तप उलटलं, मॉब लिंचिंगमध्ये तिघांचा मृत्यू; अद्याप न्याय नाहीच
Nagpur Mob Lynching : नागपुरात मॉब लिंचिंग प्रकरणात नाथ जोगी समाजातील तिघांची हत्या झाली होती, तर एकाला कायमच अपंगत्व आलं. या चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहे.
![Crime News : निर्घृण हत्याकांडाला एक तप उलटलं, मॉब लिंचिंगमध्ये तिघांचा मृत्यू; अद्याप न्याय नाहीच Nagpur Crime news Three people from buldhana Nath Jogi community were killed in nagpur Mob Lynching Maharashtra marathi news Crime News : निर्घृण हत्याकांडाला एक तप उलटलं, मॉब लिंचिंगमध्ये तिघांचा मृत्यू; अद्याप न्याय नाहीच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/09/3051668cb3520717b09818a78e5515861715263206482322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलढाणा : चोर आणि मूल पळविणारी टोळी समजून बुलढाण्यातील तिघांची नागपुरात जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला एक तप एवढा काळ उलटूनही पीडित कुटुंबांना अद्याप न्याय मिळालेला नाही. विविध देवादिकांचे रूप घेऊन भिक्षा मागणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील मोहिदेपुर येथील नाथजोगी समाजातील तीन इसमांची नागपूर (Nagpur) येथील जरीपटका भागात चोर आणि मूल पळविणारी टोळी समजून जमावाकडून हत्या (Mob Lynching) करण्यात आली होती. 9 मे रोजी या घटनेला बारा वर्ष म्हणजे एक तप झालं. मात्र एक तपाचा काळ उलटल्यावरही या पीडीत कुटुंबाला अद्यापही न्याय मिळाला नसल्याने हे चार कुटुंब अद्यापही उघड्यावर पडलेली आहेत. त्यावेळी राजकीय नेत्यांनी प्रसिद्धी मिळवून घेतली, तपास यंत्रणात ढिम्म राहिली मात्र, पीडीत कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
निर्घृण हत्याकांडात तिघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर आणि सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं मोहिदेपूर हे गाव. या गावात जवळपास सर्वच कुटुंबीय हे नाथजोगी समाजाचे आहेत. एकेकाळी या समाजाला 'बहुरूपी' म्हणून ओळखलं जात होतं. राज्यभर फिरून आणि विविध देवी देवतांचं रूप घेऊन भिक्षा मागणे आणि आपला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे, हे या समाजातील लोकांचं काम.
बारा वर्षांनंतरही न्याय नाहीच
नाथजोगी समाजातील चार जण बारा वर्षांपूर्वी म्हणजे 9 मे 2012 रोजी नागपूर येथील जरीपटका, कळमना भागात देवदेवतांचे रूप घेऊन भिक्षा मागत होते. मात्र हे चौघेही जण चोरी, घरफोडी आणि मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असावेत, अशा गैरसमजातून नागरिकांनी त्यांच्या अंगावर दगड, विटाचा मारा करत हल्ला केला. या हल्ल्यात हसन दादाराव सोळंके, पंजाबराव भिकाजी शिंदे, सुपडा मगन नागनाथ या तिघांचा मृत्यू झाला तर, पंजाबराव लक्ष्मण सोळंके हे जखमी होऊन कायमचे अपंग झाले.
चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर
या घटनेतील तिघांचे आणि कायम अपंग असलेले पंजाब चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय मंडळींनी मोहिदेपुरात हजेरी लावून आपली सहानुभूती दाखवली आणि अनेक आश्वासने दिलीत, मात्र ती आश्वासनेच राहिली. आता एक तप उलटूनही या समाजातील या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही आणि त्यामुळे हे चारही कुटुंब एक तपानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
मॉब लिंचिंगच्या अनेक घटना
या घटनेनंतरही राज्यात राईनपाडा, अरण , ठाणे या ठिकाणीही मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहे. अनेक भटक्या समाजातील लोकांचे जीव गेले, अशा घटनांच्या निषेधात विविध ठिकाणी आंदोलने, उपोषणे झालीत परंतु अद्यापही शासनाला जाग आली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : सूर्यटोला जळीतकांडातील आरोपी किशोर शेंडेंला फाशी; सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)