(Source: Poll of Polls)
Ravikant Tupkar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही, त्वरीत मार्ग काढा अन्यथा...रविकांत तुपकरांचा इशारा
अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर सरकारनं मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
Ravikant Tupkar : अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं (Rain) यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांना नाही. याच मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. यासंदर्भातील स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांची भेट घेतली. त्वरीत शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारनं त्वरीत यावर मार्ग काढावा अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल असा इशारा तुपकरांनी दिला.
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. आपण केलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी राज्य सरकारने 157 कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी दोन टप्यात जवळपास 174 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परंतू, अद्याप ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. पैसे जमा करण्यासाठी शासनाने ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला आहे. पंरतू, या पद्धतीला काही कर्मचारी संघटनाचा विरोध असल्याने, प्रशासन विरुद्ध कर्मचारी संघटना असे चित्र आहे, त्यामुळं अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या याद्या तयार झाल्या नाहीत. नुकसानीचे अनुदानही रखडले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं तातडीने यामध्ये मार्ग काढून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. ह.पी. तुम्मोड यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारनेही तातडीने यामध्ये मार्ग काढावा
ऑनलाइन पद्धतीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळं राज्य सरकारनेही तातडीने यामध्ये मार्ग काढावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागेल असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नावरुन तुपकर आक्रमक
रविकांत तुपकर हे सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भातही सातत्यानं आवाज उठवत आहेत. सध्या कापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. यावरुन रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आणि कापू, सोयाबीनच्या दरासंदर्भात तुपकरांनी बुलढाण्यात मोठा मोर्चाही काढला होता. त्यानंतर मुंबईत जलसमाधी आंदोलनाचाही इशारा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या: