Buldana Kidnapping : अपहरणाचा कट रचणाऱ्या तीनही युवकांना नोकरी देणार, बुलढाणा अर्बनच्या राध्येशाम चांडक यांचा निर्णय
Buldana Kidnapping Case : बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी या तीनही युवकांना माफ करत आपल्या संस्थेत रोजगार देण्याचं किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव या ठेवला आहे.
Buldana Kidnapping Case : गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राची हेडलाईन असलेलं बुलढाण्यातील दोन दिग्गजांचा अपहरणाच्या प्रकरणाला आता नवीन वळण आलं आहे. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी या तीनही युवकांना मोठं मन दाखवत माफ केलं असून आपल्या संस्थेत रोजगार देण्याचं किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव या तीनही युवकांच्या परिवारासमोर ठेवला आहे. जर बेरोजगार युवक अशा प्रकारचा कट करण्याची कल्पना करत असतील तर मी माझ्या संस्थेत त्यांना रोजगार देण्यास तयार आहे. हे युवक वयाने लहान असून त्यांना घडवण्यासाठी सामाजिक जबाबदारी घेत बुलढाणा अर्बन या युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करेल, असेही राधेश्याम चांडक यांनी म्हटले आहे.
अपहरणाचा कट रचणाऱ्या तीनही युवकांना नोकरी देणार
सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात बुलढाण्यातील तीन तरुण हे अजमेर शरीफ येथे दर्शनाला जातो म्हणून घरून निघून गेले. तीनही तरुण 20 ते 21 या वयोगटातील आहेत. अजमेर शरीफ येथे गेल्यानंतर या तरुणांनी एक नकली बंदूक खरेदी केली आणि त्याच ठिकाणी त्यांना पोलिसांनी संशयास्पद रित्या फिरत असताना चौकशी केली त्यांच्याजवळ आढळलेल्या नकली बंदूकमुळे या तीनही युवकांना दिल्लीच्या आयबी पोलिसांनी दिल्ली येथे नेले. दिल्लीला नेल्यानंतर त्यांची सलग तीन ते चार दिवस चौकशी केली चौकशी अंतिम काहीही न आढळल्याने या युवकांची दिल्ली पोलिसांनी सुटका केली आणि बुलढाणा पोलिसांना माहिती देऊन या तीनही युवकांवर बारकाईने लक्ष देण्याची सूचना केली. त्यानुसार ज्यावेळी हे तीनही तरुण बुलढाण्यात पोचले, तर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने आणि दहशतवादी विरोधी पथकाने या तीनही युवकांची चौकशी करून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. बुलढाणा पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांनी बुलढाण्यातील दोन दिग्गज राधेश्याम चांडक आणि मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचला होता. मात्र प्रत्यक्ष कृती न झाल्यामुळे यांच्यावर फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आलं होतं, हे प्रकरण गेल्या आठवड्यात जिल्ह्यासह राज्यात गाजलं होतं.
राधेश्याम चांडक आणि चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा डाव उधळला
बुलढाण्यातील दोन दिग्गज सहकार महर्षी राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट रचल्यानंतरही या तरुणांवर प्रत्यक्ष कारवाई न केल्याचा फायदा झाल्यामुळे या तरुणांची फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करून सुटका झालेली आहे. मात्र बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी या तीनही मुलांना माफ करून आणि सामाजिक दायित्व दाखवत आपल्या संस्थेत रोजगार देण्याचे किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव या तीनही मुलांच्या परिवारासमोर ठेवला आहे. यामुळे मात्र बेरोजगार युवक जर खरंच अशा प्रकारचा कट कारस्थान करत असतील तर मात्र सर्वांसाठीच ही बाब धक्कादायक आहे. दरम्यान या तिन्ही तरुणांनी अपहरणाचा कट रचला नसल्याचा दावा केला आहे. राधेश्याम चांडक यांनी मोठ्या मनाने या तरुणांना माफी करून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे, याचं कौतुक होत आहे.