एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Buldhana News: शेगाव - खामगाव महामार्गाच्या मध्यभागी पंक्चरचे दुकान, मार्ग बनवणाऱ्या ठेकेदाराचा अजब प्रकार ; तर मार्ग पूर्ण झाल्याची नितीन गडकरींची घोषणा

गेल्याच आठवड्यात या मार्गाच काम पूर्ण झालं असल्याची घोषणाही नितीन गडकरींनी खामगाव येथील सभेत केली होती. मात्र अपूर्ण मार्गच काम हे गडकरींना पूर्ण झाल्याच अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे उघड झाले आहे.

बुलढाणा:  अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या शेगाव - खामगाव मार्गावर काम पूर्ण करण्यासाठी मार्ग बनविणाऱ्या ठेकेदाराचा अजब नमुना समोर आला आहे. शिल्लक मार्गच काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत चक्क मध्यभागी पंक्चरचे दुकान तसेच ठेवून दुकानाच्या दोन्ही बाजूने  काम करून ठेकेदार आता आपल बस्तान गुंडाळण्याचा तयारीत आहे.  

चक्क महामार्गाच्या मध्यभागी दुकान

शेगाव -  खामगाव महामार्गाच काम सुरू होऊन तब्बल पाच वर्ष झालीत. मात्र हा महामार्ग अद्याप ही पूर्ण झालेला नाही. गेल्या आठवड्यात हा महामार्ग पूर्ण असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खामगाव येथील सभेत जाहीर केलं. मात्र या महामार्गावर ठेकेदाराने एक मोठा प्रताप करून ठेवला आहे. या महामार्गावर एका ठिकाणी महामार्गाच्या बाजूला एक पंक्चर व टायर दुरुस्तीचे दुकान आहे. दुकान मालकाने  हे दुकान न हटवल्याने ठेकेदाराने चक्क दुकान महामार्गाच्या मध्यभागी असलेले दुकान तसेच ठेवून दुकानाच्या दोन्ही बाजूने काम सुरू केलं आहे. सध्या हे काम सुरू असून या कामाकडे महामार्गावरून जाणारे नागरिक मात्र कुतूहलाने बघत आहे.

गेल्याच आठवड्यात या मार्गाच काम पूर्ण झालं असल्याची घोषणाही नितीन गडकरींनी खामगाव येथील सभेत केली होती. मात्र अपूर्ण मार्गच काम हे गडकरींना पूर्ण झाल्याच अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे उघड झाले आहे. मार्गच काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात मात्र ठेकेदार मार्गाच्या मध्यभागी हे दुकान आहे हे विसरल्याच दिसतोय किंवा अत्याधुनिक सेवा वाहनधारकांना मिळावी म्हणून तर हे पंक्चर आणि टायर दुरुस्तीचे दुकान मार्गावर ठेवण्यात आल नसावं ना..? असा प्रश्न मात्र या मार्गावरून जाणाऱ्या भोळ्या भाबड्या वाहनधारकांना पडत आहे. 

 इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संबंधित ठेकेदार या संदर्भात विचारणा केली असता या दुकानदाराने न्यायालयात मोबदल्यासाठी याचिका दाखल केलेली असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. मात्र मग न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न होताच मार्गच काम कसं पूर्ण करण्यात येत आहे ? यावर त्यांनी मौन साधले. मात्र कॅमरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र राज्यभरातून या मार्गाने शेगाव येथे जाणाऱ्या लाखो भाविकांना मार्गाच्या मध्यभागी असलेल्या या पंक्चर दुकानाच्या आधुनिक सुविधेचा फायदा मात्र मिळत आहे.

हे ही वाचा :

अपघात असो की ट्रॅफिक जॅम वा असो पर्यायी मार्ग, आता सिन्नर-शिर्डी महामार्गावर एटीएमएस यंत्रणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget