एक्स्प्लोर

Buldhana News : एक लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक, एसीबीची बुलढाण्यात मोठी कारवाई

Buldhana News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात मोठी कारवाई केली. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाचघेताना रंगेहाथ पकडले आहे.

Buldhana News : बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात (Buldhana) मोठी कारवाई केली. जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (Deputy District Magistrate) भिकाजी घुगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी लाच मागितली होती. याचा पहिला हफ्ता स्वीकारताना एसीबी त्यांना अटक केली. काल (28 डिसेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास केलेली ही कारवाई मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

पहिला हफ्ता स्वीकारताना तीन आरोपींना बेड्या

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याची जिगाव प्रकल्पात जमीन गेली होती. त्यात वडिलांच्या नावाऐवजी काकाचे नाव यादीत आल्याने ते नाव बदलून घेण्यासाठी तो कार्यालयात आला होता. परंतु या प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मिळणाऱ्या रकमेच्या 10 टक्के रक्कम लाच उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी मागितली होती. शेतकऱ्याला मिळणारी संपूर्ण रक्कम 21 लाख होती त्याची 10 टक्के रक्कम म्हणजे 2 लाख 17 हजार रुपयांची लाच घुगे यांनी मागितली होती. त्याचा एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारताना भूसंपादन उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यात त्यांचा लिपिक नागेश खरात आणि वकील अनंत देशमुख अशा तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

कारकुनाच्या माध्यमातून लाचेची मागणी

हिंगणा इच्छापूर इथल्या व्यक्तीने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी लाच मागितल्याचं 26 डिसेंबरच्या पडताळणीदरम्यान स्पष्ट झालं होतं. मध्यम प्रकल्प भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून नागेश खरात याच्या माध्यमातून तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. ही कारवाई बुलढाणा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सचिन इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. 

भिकाजी घुगे यांना याआधी लाच घेताना अटक

विशेष म्हणजे लाच घेताना अटक  उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांची ही पहिली वेळ नाही. भिकाजी घुगे हे 2017 साली उस्मानाबाद इथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना तिकडेही त्यांना 12 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur News : लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, अफवांनाही उधाण
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Yashwant Sardeshpande Passed Away: आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur News : लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, गावकऱ्यांना 32 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
लातूरच्या तीन गावात भूगर्भातून मोठा आवाज अन् जमीन हलल्याचा भास; भयभीत नागरिक रस्त्यावर, अफवांनाही उधाण
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Yashwant Sardeshpande Passed Away: आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
आधी छातीत दुखलं, रुग्णालयात नेईपर्यंत जगच सोडलं; प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्यानं घेतला अखेरचा श्वास, 62व्या वर्षी निधन
Tilak Verma Net Worth : तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
तिलक वर्मा ठरला आशिया चषकातील फायनलमधील भारताच्या विजयाचा हिरो, जाणून घ्या युवा खेळाडूची नेटवर्थ 
Mainak Ghosh : एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
एकीकडे जिल्हाधिकारी नाचगाण्यात दंग, दुसरीकडे वडिलांचे अंत्यसंस्कार करुन IAS मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला; धाराशिव पुरातील दोन दृष्यं
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
अमेरिकेच्या दबावामुळे यूपीए सरकारनं 26/11 नंतर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही, पी चिदंबरम यांचा मोठा  गौप्यस्फोट 
IND vs PAK : भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार, भारताचं पूर्ण वेळापत्रक 
Asaduddin Owaisi in Kolhapur: आतातरी एकत्र व्हा, भाजप अन् मोदींना हरवा, फडणवीसंना घालवा; कोल्हापूरमध्ये ओवेसींचं मुस्लीमांना आवाहन
आतातरी एकत्र व्हा, भाजप अन् मोदींना हरवा, फडणवीसंना घालवा; कोल्हापूरमध्ये ओवेसींचं मुस्लीमांना आवाहन
Embed widget