एक्स्प्लोर

Asaduddin Owaisi in Kolhapur: आतातरी एकत्र व्हा, भाजप अन् मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा; कोल्हापूरमध्ये ओवेसींचं मुस्लीमांना आवाहन

Asaduddin Owaisi in Kolhapur: देश रक्षणासाठी रोज सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांना आज काय वाटत असेल, आमची तुलना क्रिकेटरसोबत होतेय. भारत पाकिस्तानसोबत का खेळला?

Asaduddin Owaisi Speech in Kolhapur: आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूरमधील जनतेने एमआयएम पक्षाला भरभरुन मतदान करावे. आता एकत्र होण्याची गरज आहे. भाजप आणि मोदींना हरवा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सत्तेतून घालवा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केले. सोमवारी कोल्हापूरमध्ये ओवेसी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. (Kolhapur News)

ही वेळ मुसलमानांनी सतर्क राहण्याची आहे. मुसलमानांनो तुम्ही तुमची राजकीय लीडरशिप तयार करा, तुम्ही एकत्र व्हा. इम्तियाज जलील यांचे राजकीय नेतृत्व टिकू नये यासाठी शिंदे, शरद पवार, अजित पवार, फडणवीस, ठाकरे सगळे एकत्र झाले. तुम्ही जर सो कॉल्ड पुरोगामी पक्षांना मतदान करत असाल तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकत नाही. मनोज जरांगे पाटील फक्त तीन दिवस उपोषणाला बसले, सरकार त्यांच्या पायाशी आले. त्याप्रमाणे मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे, असे ओवेसी यांनी म्हटले.

आज मला कोल्हापूरमध्ये येऊ देण्यास विरोध करण्यात आला. मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दुधाचे दात अजून पडले नाहीत. मी पाकिस्तानमध्ये जाऊन बोलणारा व्यक्ती आहे. मी तुमच्या बापाशी भांडणारा माणूस आहे. इथे आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला लव लेटर दिले. प्रक्षोभक भाषण करू नका, असे सांगण्यात आले. आम्ही प्रक्षोभक भाषण करत नाही. मात्र, राज्यातील सत्ताधारी नेते रोज महाराष्ट्रात प्रक्षोभक भाषण करत आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करता?, असा सवाल ओवेसी यांनी विचारला.

I Love Muhammad: मोहम्मदचे पोस्टर रस्त्यावर टाकू नका ते छातीशी कवटाळून ठेवा: ओवेसी

आय लव मोहम्म चे पोस्टर घेऊन फिरणं सोपं आहे. मात्र त्यांचे विचार तुम्ही आत्मसात करताय का? तुम्ही खरे मुसलमान असाल तर व्यसनापासून दूर राहा, असा सल्ला ओवेसी यांनी तरुणांना दिला. विरोधक तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. पण शहाणे व्हा. या जाळ्यात अडकू नका. या सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहायला शिका. मोहम्मदचे पोस्टर रस्त्यावर टाकू नका ते छातीशी कवटाळून ठेवा. मोहम्मद हे फक्त नाव नव्हतं. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये काही घडलं तर त्यावेळी मुख्यमंत्री असलेले बाबा भरभरून बोलले. मात्र, फतेहपुरमध्ये दर्ग्यावर हल्ला झाला त्यावर ते काहीही बोलले नाहीत. हाच यांचा दुटप्पीपणा आहे. लोकांवर जुलूम करणाऱ्यांचे आता काही थोडे दिवसच बाकी आहेत.तुम्ही मोदी, अमित शहा, शिंदे, फडणवीस यांना कोणालाही घाबरू नका. फक्त अल्लाला घाबरा. ही हुकूमत मुसलमानांची विरोधक आहे. भाजपा मुस्लिमांचा इतका तिरस्कार का  करतो? मस्जिद आणि दर्गापासून आम्ही मुसलमानांना लांब करतोय असं मोदींना वाटत असेल. मात्र, मोदीजी हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही कायम मशीद आणि दर्ग्यासाठी जगू आणि मरु. सगळ्यांना जीव आहे हे लक्षात ठेवा. आम्ही सगळ्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, असेही ओवेसी यांनी म्हटले.

Ind Vs Pak Asia Cup: आपण आशिया कप खेळलो नसतो तर आभाळ कोसळणार होतं का? ओवेसींचा सवाल

मला आनंद आहे मी कोल्हापूरला येऊ शकलो. ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आजरा इचलकरंजी,कोल्हापूर, कुरुंदवाड या भागात एमआयएम पक्ष निवडणुका लढवणार आहे. पहलगाममध्ये भारतीयांना धर्म विचारून मारलं गेले. ऑपरेशन सिंदूरने आपण बदला घेतला. आपण पाकिस्तानचे 80 टक्के पाणी बंद केलं आहे, आपली विमानं पाकिस्तानच्या हद्दीत जात नाहीत, असे असताना  आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच का खेळलो? मोदीजी म्हणाले होते खून आणि पाणी एकत्र वाहणार नाही. त्याच काय झालं? आपण आशिया कप खेळलो नसतो तर आभाळ कोसळणार होतं का? पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत काय आहे, हे तरी सांगा. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचे उत्तर द्यावे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांचे शौर्य होते. या बहादुर सैनिकांची तुलना तुम्ही क्रिकेटरसोबत करत आहात.  राष्ट्रीयत्वाच्या बाता करणाऱ्यांनो तुम्ही मरून जा, तुमचा स्वाभिमान मेला आहे. मोदीजी तुम्ही किती दिवस देशप्रेमाचं नाटक करून लोकांना धोका देणार आहात, असा सवालही ओवेसी यांनी विचारला.

आणखी वाचा

एमआयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर; हिंदुत्ववादी संघटनांचा कडाडून विरोध

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
Baramati Nagar Parishad Election: अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवार देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, मोहम्मद शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध पराभव, शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
Azam Khan: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान, मुलगा अब्दुल्लाला डबल पॅन कार्ड प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जेलमधून झाली होती सुटका
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान, मुलगा अब्दुल्लाला डबल पॅन कार्ड प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जेलमधून झाली होती सुटका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare  PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
शरद पवारांच्या नेत्याची पत्नी ऐनवेळी शिवसेनेत, तर भाजप समर्थकांना शिंदे गटातून उमेदवारी; बार्शीत असं फिरलं राजकारण
Baramati Nagar Parishad Election: अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवारी देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
अखेर सस्पेन्स संपला! बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी उमेदवार देताच भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा; महाविकास आघाडीचं अजूनही ठरंना
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, मोहम्मद शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
टीम इंडियाचा आफ्रिकेविरुद्ध पराभव, शमीकडून रणजीत धमाका सुरुच, दुसऱ्या कसोटीसाठी बोलावणं येणार?
Azam Khan: समाजवादी पक्षाचे नेते आझम खान, मुलगा अब्दुल्लाला डबल पॅन कार्ड प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जेलमधून झाली होती सुटका
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान, मुलगा अब्दुल्लाला डबल पॅन कार्ड प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा; अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जेलमधून झाली होती सुटका
Video: ड्रग्ज तस्करी करणारी बोट भर समुद्रात अमेरिकेनं फिल्मी स्टाईलने हवाई हल्ला करत बेचिराख केली; ट्रम्पकडून थेट आदेश
Video: ड्रग्ज तस्करी करणारी बोट भर समुद्रात अमेरिकेनं फिल्मी स्टाईलने हवाई हल्ला करत बेचिराख केली; ट्रम्पकडून थेट आदेश
साताऱ्यात अमोल मोहितेंचा शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल ;  उदयनराजेंची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांच्या नाराजीच्या साताऱ्यात चर्चा
साताऱ्यात अमोल मोहितेंचा नगराध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल, उदयनराजेंची अनुपस्थिती चर्चेत
जालन्यातील 54 वर्षीय पोलीस निरीक्षकाने तिसऱ्यांदा पटकावला आर्यन मॅनचा खिताब; व्हिएतनाममध्ये रेस
जालन्यातील 54 वर्षीय पोलीस निरीक्षकाने तिसऱ्यांदा पटकावला आर्यन मॅनचा खिताब; व्हिएतनाममध्ये रेस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Embed widget