एक्स्प्लोर

Buldhana Crime : 'मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते', सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची महाविद्यालयातच आत्महत्या

Buldhana Crime : 'एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलत,' अशी सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याने महाविद्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यात घडली आहे.

Buldhana Crime : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने (College Student) वर्गाच्या खोलीतील सीलिंग फॅनला (Ceiling Fan) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईड नोट (Suicide Note) देखील आढळली. ज्यात 'एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते' असा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. 

महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतील सीलिंग फॅनला गळफास

बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाती ही घटना घडली. सूरज रामकृष्ण गावंडे अस आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो जळगाव जामोद तालुक्यातील येणंगाव इथला रहिवासी होता. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतच सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (1 फेब्रुवारी) संध्याकाळी ही घटना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तसंच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

सुसाईट नोट सापडली, पोलिसांकडून तपास सुरु

यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विद्यार्थ्याच्या मृतदेहाच्या शेजारुन सुसाईड नोट हस्तगत केली. "एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते...!" असा उल्लेख या नोटमध्ये केलेला आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे.  

पालघरमध्येही विद्यार्थ्याने आश्रमशाळेतील बाथरुमध्ये गळफास घेतला

पालघर (Palghar) जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. तलासरीमधल्या (Talasari) झरीतील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केली. या विद्यार्थ्याने बाथरुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. अलेश विनय लखन असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो तलासरी तालुक्यातील सावरोळी उधानपाडा इथला मूळचा रहिवासी होता. 'अलेश डेथ आणि व्हॉट आय डू?' असं मृत त्याच्या हातावर लिहिलेलं होतं. अलेश हा अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणाच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. 

हेही वाचा

Buldhana Crime : तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरला जीवे मारलं, आरोपी आणि त्याच्या पत्नीला बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 21 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
Embed widget