एक्स्प्लोर

Buldhana: फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या चौघांकडून कर्जदाराचे अपहरण, मारहाण करत तीन दिवस शरीरावर दिले सिगारेटचे चटके

कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन कर्जदार अशपाक खान याचे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण केले

बुलढाणा:  बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहे . फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या बाउन्सरनी कर्जदाराचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे. मारहाणच नव्हे तर तीन दिवस डांबून ठेऊन शरीरावर सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले. या घटनेमुळे संताप व्यक्त होतो आहे. कर्जवसुलीसाठी कर्जदारांना वसुली अधिकाऱ्यांनी धमकी देऊ नये, त्यांना अवेळी कॉल करू नये असं रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) निर्देश देऊनसुद्धा त्याचं पालन करण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेगावात उघडकीस आली. कॅपिटल नावाच्या कंपनीकडून शेगाव येथील अशपाक खान मेहता या 32 वर्षीय युवकाने बोलेरो वाहनावर कर्ज घेतले होते. मात्र वाहनाचा व्यवसाय मंदीत आल्याने कर्जदाराने हे वाहन अकोला येथील एकाला विकले आणि कायदेशीररित्या त्याकडून नोटरी करून घेऊन कर्जाची रक्कम तो फेडेल असा करारनामा केला. मात्र सदर कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन कर्जदार अशपाक खान याचे रेल्वे स्टेशन परिसरातून अपहरण केले

अपहरण केल्यानंतर  स्थानिक शेगावातील विश्रामभवनात नेले व तेथे रात्री उशिरापर्यंत बेदमपणे मारहाण केली. यानंतर सदर कर्जदाराला मोटरसायकलवर बसवून खामगाव शहरातील शंकरनगर भागातील एका घरात नेऊन तिथे डांबून ठेवले यानंतर चौघांनी सदर कर्जदाराला बेदमपणे मारहाण करत संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके दिले. हा अत्याचार त्यांचा दिवसभर चालला सतत तीन दिवस या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार करण्यात आला. एवढेच नाही तर कर्जदाराकडून दोन चेकवर स्वतःच्या हस्तक्षरात सात लाखांची रक्कम टाकून घेऊन व्हिडिओ बनवण्यात असल्याचे पीडित सांगतो. यानंतर गाडी परत आणून देतो या आश्वासनानंतर गंभीर जखमी असलेल्या अशपाक खानला खामगावच्या बस स्थानकावर शंभर रुपये देऊन सोडून देण्यात आले.

 अशपाक खान याने शेगाव गाठल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली यानंतर बुधवारी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली यामध्ये आरोपी विजय काळे , मंगेश तायडे , प्रवीण बोदडे रआणि आणखी एक अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget