एक्स्प्लोर

बहुप्रतिक्षित भेंडवळची घट मांडणी येत्या शनिवारी, अंदाज जाहीर होतील रविवारी; राज्यभरातील शेतकरी भविष्यवाणीच्या प्रतिक्षेत

Bhendwal Bhavishyavani : 350 वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात.

Bhendwal Bhavishyavani 2023 : शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची  धान्य, अशा या 'घट मांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.  राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, अशी ही घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. 

350 वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. गेल्या तीन वर्षांत  देशावर कोरोना सारख्या भयंकर संकटानं आक्रमण केलं होतं. त्यामुळे याठिकाणी राज्यभरातून शेतकरी येऊ शकले नाहीत. यंदा मात्र येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हे अंदाज किती खरे ठरतात? यावर शंका असली आणि या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला, तरीही शेतकरी वर्ग मात्र यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात.

काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?

पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. 

भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?

भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.

(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Embed widget