एक्स्प्लोर

Buldhana News : कृषी कार्यालयात मीटिंगच्या नावाखाली अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची पार्टी? दुर्गम व आदिवासी भागातून कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना ठेवलं ताठकळत

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम अशा संग्रामपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बैठकीच्या नावाखाली कार्यालयात चक्क पार्टी सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम अशा संग्रामपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बैठकीच्या नावाखाली कार्यालयात चक्क पार्टी सुरु असल्याचा धक्कादायक आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे कार्यालयीन कामासाठी आलेले आदिवासी आणि दुर्गम भागातील शेतकरी व वृद्ध महिलांवर मात्र दिवसभर ताठकळत राहण्याची वेळ आली आहे. सकाळी अकरा वाजेपासून आलेले शेतकऱ्यांना बैठक सुरू असल्याचं सांगण्यात आलं. मात्र दिवसभर बैठकीच्या नावाखाली एकाही शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकारी न भेटल्याने संतप्त शेतकरी घरी निघून गेले. या प्रकारामुळे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

8 वर्ष लेकरासारखं जपलेल्या उभ्या सिताफळ बागेवर जेसीबी फिरवण्याची वेळ

सिताफळला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आणि कीड रोगासह फळवाढी दरम्यान कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत नसल्याने येवती गावात एकाच दिवशी 3 शेतकऱ्याने उभ्या सिताफळ बागेवर जेसीबी फिरवत सिताफळ बाग उपटून टाकल्याची घटना घडलीय. वाशिम जिल्ह्यात येवती गावातील शेतकऱ्याने काल एकाच दिवशी हे कृत्य केलं आहे. यात रामचंद्र गवळी यांनी आपल्या शेतातील 4 एकर, विजय बळीराम शिंदे तीन एकर तर विजय प्रल्हाद शिंदे यांनी 2 एकर सिताफळ बागेवर जेसीबी फिरवला.

ना उत्पन्न, ना भाव, ना बाजारपेठ

दरम्यान, सिताफळबागेव 8 वर्ष लेकरासारखं जपलेल्या बागेवर जेसीबी फिरवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. क्रॉसिंगच्या नावाखाली मार्केटिंग करून कोट्यावधी रुपये कमावून देऊ, निसर्ग आणि व्यवस्था यात आधीच भरडलेल्या कास्तकाराच्या मस्तकी कमी दर्जा देणारी सिताफळ प्रजाती दिल्याने हि वेळ बळीराज्यावर आल्याचे शेतकरी सांगताय. तसेच ना उत्पन्न, ना भाव, ना बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आणि कृषी विभागाच्या बाबू शाही धोरणामुळे आणि सातत्याने बदलत्या वातावरण कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने उभ्या बागेवर जेसीबी फिरवल्याचेही शेतकरी सांगतात.

वर्ध्याच्या देवळी येथे उमेदवाराचा ट्रॅक्टरवरून प्रचार

देवळी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि देवळी जनशक्ती पक्ष अशी तिहेरी लढत पहायला मिळते आहे. येथे विविध सामाजिक व शेतकरी संघटना मिळून देवळी जनशक्ती आघाडी तयार करण्यात आली. शेतकरी नेते किरण ठाकरे हे जनशक्ती आघाडीकडून नागराध्यक्ष पदासाठी रिंगणात तर भाजपकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस आणि काँग्रेसकडून सुरेश वैद्य रिंगणात आहे. येथे शहरात करण्यात आलेल्या विविध कामाच्या चुकावर बोट ठेवले जात असतानाच प्रचाराचा जोर वाढलाय. जनशक्ती आघाडीच्या उमेदवाराने ट्रॅक्टरवर शहरात फिरून प्रचार सुरू केलाय. तर भाजपकडून देखील रॅली, कॉर्नर मिटिंग केल्या जात आहे. देवळी जनशक्ती आघाडीची प्रचारातील आघाडी नेमके कुणाचे गणित बिघडवते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेय.

ही बातमी वाचा:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget