Budget 2021 Speech Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या पहिल्या एक तासात केल्या 'या' मोठ्या घोषणा
Union Budget 2021 Speech Highlights : संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : आज दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत.कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून गरिबांसाठी मोफत गॅस, राशन या सुविधा देण्यात आल्या होत्या. बजेट सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोना काळात आम्ही पाच मिनी बजेट सादर केले होते. तसेच सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा देखील केली होती. कोरोना काळात सरकारने 21 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा देखील केली होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या पहिल्या एक तासात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
- कोरोनामुळे आव्हाने वाढली आहे. आर्थिक मंदीबाबत विचार केला नव्हता.
- कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
- कोरोना काळात ८० कोटी जनतेला विनामूल्य राशनचे वाटप केले.
- कोरोना काळात घरपोच दूध आणि राशन मिळाले.
- कोरोना काळात काम केलेल्या योद्ध्यांना सलाम
- अनेक मंत्री आणि खासदारांनी कोरोना काळात आपला पगार दिला
- कोरोना काळात भारत सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली.
- कोरोना काळात पाच मिनी बजेट सादर केले.
- आरबीआयने 27 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली
- सरकारने जे आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली त्याचा जीडीपी 13 टक्के आहे
- पीएम गरीब कल्याण योजना कोरोना काळात आणली.
- सध्या भारतात दोन वॅक्सीन आहे. येत्या काही दिवसात अजून दोन वॅक्सीन उपलब्ध होतील.
- आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वत: वर विश्वास ठेवणे.
- आत्मनिर्भर भारत योजना 130 कोटी भारतीयांच्या आशेचं प्रतिक आहे.
अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark.' यांच्या वचनांचा उल्लेख केला. याचा अर्थ असा होतो की, "विश्वास असा पक्षी आहे, जो पहाटे दाट अंधार असतानाही प्रकाशाची अनुभूती घेतो आणि गातो."
- देशाचा जीडीपी सलग दोनदा मायनसमध्ये गेला आहे.
- 2021 हे वर्ष ऐतिहासिक असणार आहे.
- आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी 64, 180 कोटी रुपये दिले आहे.
- स्वच्छ भारत मिशनला पुढे नेण्यासाठी शहरांमध्ये अमृत योजना आणली.
- स्वच्छ भारत मिशनसाठी 2,87,000 कोटी रूपये देण्यात आले.
- कोरोना वॅक्सीनसाठी 35 हजार कोटींची घोषणा
- देशात 7 नविन टेक्सटाईल पार्क बनवण्यात येणार आहे.
- तामिळनाडूतील नॅशनल हायवेसाठी 1.03 लाख कोटी देण्यात आले आहे.
- केरळमधील नॅशनल हायवेसाठी 65 हजार कोटी रुपये
- मुंबई- कन्याकुमारी इकोनॉमिक कॉरिडोरची घोषणा
- कोलकाता- सिलीगुडी नॅशनल हायवे प्रोजेक्टची घोषणा
- आसाममध्ये तीन वर्षात हायवे आणि इकोनॉमिक कॉरीडोर
- राष्ट्रीय रेल्वे योजना 2030, 1.10 लाख कोटी रुपये रेल्वेसाठी देण्यात आले आहे
- मेट्रो, सिटी बस. बस सेवांसाठी 18 हजार कोटी रुपये