एक्स्प्लोर

महिला सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवण्याऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध गावकरी आक्रमक, केली निलंबनाची मागणी

Buldhana Viral Video : बुलढाण्यातील त्या ग्रामपंचायत सचिवाविरोधात गावकरी चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी त्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. 

बुलढाणा : महिला सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवणाऱ्या डोनगाव ग्रामपंचायत सचिवाविरोधात गावकरी एकवटले असून त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे. 

या ग्रामपंचायत सचिवाने नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकविल्याचं सीसीटीव्ही फुटेज दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल (Buldhana Viral Video) झालं आहे. त्यामध्ये जनता बदमाश आहे, मतदान करणारे चोर आहेत असंही हा ग्रामपंचायत सचिव त्या महिला सरपंचाला सांगताना दिसत आहे.

या संबंधित व्हिडीओ गावात व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यानंतर आता गावकऱ्यांनी त्या ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे. 

काय आहे व्हिडीओमध्ये? 

बुलढाणा  (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचे सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवितानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. यात ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सारपंचाचा पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल आणि प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेले असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

ग्रामसचिव हा महिला सरपंचाला म्हणतो की , "पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे, जसं जळतं तसं जळू द्यायचं. कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे. एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही. मतदान करणारे चोर आहेत. आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे.

जनतेच्या जीवावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवेसाठी नोकरी करत असलेले सरकारी नोकरांची जर जनतेच्याप्रति ही मानसिकता असेल तर काय म्हणायचं. अशीच परिस्थीती कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी असण्याची शक्यता आहे. मात्र नवख्या सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवणारे ग्रामसेवक मात्र जरा वेगळेच असतील. घडलेल्या या प्रकारावर आणि सीसीटीव्ही फुटेजवर गावकऱ्यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे, आता बुलढाणा जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget