एक्स्प्लोर

खुर्च्या फेकल्या, एकमेकांना धक्काबुक्की; भंडाऱ्यात सदावर्तेंच्या एसटी बँकेची सभा उधळली

Bhandara ST Transport Co operative Bank : गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी सोडून बाहेरचे सभासद बनवले, बँकेत 35 लाखांचा अपहार केला असा आरोप विरोधी एसटी कामगार कृती समितीने केला. 

भंडारा : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलकडून बोलावण्यात आलेली भंडाऱ्यातील एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा चांगलीच वादळी ठरली असून प्रचंड गदारोळानंतर ही सभा संपली. या सभेमध्ये पोलिसांवर खुर्च्या फेकण्यात आल्या आणि एकमेकांना धक्काबुक्की झाली.  अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव विरोधकांनी मांडला. तर मारहाण केल्याप्रकरणी सदावर्तेंच्या समर्थकांची भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. 

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण 71 वी सभा भंडाऱ्यात आयोजित करण्यात आली होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा अक्षरश: उधळून लावली. वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र यांच्यासह नथुराम गोडसे यांच्या छायाचित्र लावल्याचा मुद्दा रेटून धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी वाद वाढला आणि विरोधकांनी अक्षरश: अहवालाची पुस्तकं फाडून फेकली. 

एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुकी करत खुर्च्यांची तोडफोड करून फेकाफेकी केली. यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारण्यात आल्यात. एसटी कामगार कृती समितीनं सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. तर, सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली. 

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या फेकून मारल्या प्रकरणी विरोधकांच्या विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे विरोधकांनी गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ठराव पारित केला.

सदावर्तेंनी भ्रष्टाचार केला, विरोधकांचा आरोप

एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यावेळी म्हणाले की, जिथं सदावर्ते पती पत्नी आहेत, तिथं निश्चितपणे राडा आलाच.सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनविल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. आज भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार, कायद्यानुसार झालेली नाही. अॅड गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वकील असून बँकेतून त्यांनी 35 लाख रुपये लुटले. सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित केला. 34 कोटींचे डेटा सेंटर आणलेत त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना या सभेत बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा उधळून लावली. सदावर्तेंमध्ये दम असेल तर समोरासमोर यावं. हॉटेलमध्ये झोपा काढून बाउन्सर एसटीच्या सभासदांवर पाठवून भ्याडपणा करू नये.

काँग्रेसने बँकेची बदनामी केली, सदावर्ते पॅनेलचा दावा

तर सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक सदावर्ते यांनी हिसकावली. सोन्याची अंडी देणारी बँक अशी काँग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेमध्ये त्यांनी हा राडा केला आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी ज्यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक यांना निवडून आणण्यात सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका होती. मागील 30-40 वर्षांमध्ये ते करू शकले नाहीत, अशी काँग्रेस - राष्ट्रवादीची धारणा झाली आणि त्यामुळेच बँकेला हा बदनाम करण्याचा प्रकार आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
BCCI Rule For Team India : रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
रोहितपासून विराटपर्यंत! आता एकदा नाही, 'दहावेळा' विचार करावा लागणार; खेळाडूंना कडक 10 नियम जारी, उल्लंघन केल्यास...
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Embed widget