Rice Procurement : भंडारा जिल्ह्यात 276 पैकी केवळ 55 तांदूळ खरेदी केंद्रांवर CCTV कॅमेरे; मोठ्या अपहाराची शक्यता
भंडारा जिल्ह्यात 276 पैकी केवळ 55 तांदूळ खरेदी केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV camera) लावले आहेत. त्यामुळं यामध्ये मोठा अपहार झाल्याची शक्यता आहे.
Rice Procurement : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात तांदळाच्या खरेदीत (Rice Procurement) पणन महासंघाचे निर्देश असतानाही योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचं समोर आलं आहे. 276 पैकी केवळ 55 तांदूळ खरेदी केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV camera) लावले आहेत. पणन महासंघाच्या निर्देशाचं पालन न करताच शेतकऱ्यांकडून तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीत मोठ्या अपहाराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पणन महासंघाचं निर्देश असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात केली नाही. सध्या शेतकऱ्यांकडून तांदळाची खरेदी करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात तब्बल 301 तांदूळ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 276 धान खरेदी केंद्रांपैकी केवळ 55 तांदूळ खरेदी केंद्रांवरच सीसीटिव्ही कॅमेरे लावून तांदूळ खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरेदी केंद्रांवर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस
तांदूळ उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात आता तांदूळ घोटाळ्याचा प्रकार समोर येत आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांनी 100 कोटींचा तांदूळ घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर या घोटाळ्याची मालिका जिल्ह्यात सुरू झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील तीन तांदूळ खरेदी केंद्रांवर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्यानं खरेदी केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहे. तर काहींना अटकही झाली आहे. तर काही संचालक फरार झाले आहेत. यात भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं पाटील यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केंद्रांवर अनियमितता झाल्याचे स्पष्ट होते.
चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता
भंडारा जिल्ह्यातील 276 धान खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यापूर्वी सीसीटिव्ही कॅमेरे लावून तांदूळ खरेदी करणं गरजेचं होतं. मात्र, 276 केंद्रापैकी केवळ 55 केंद्रांवर कॅमेरा लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तांदूळ खरेदी केंद्रांवरील सीसीटिव्ही कॅमेराबाबत पणन अधिकारी बोलायला तयार नाहीत. याबाबत लाखांदूर येथील एका केंद्र संचालकानं दिलेली माहिती गंभीर आहे. यामुळं आता या तांदूळ खरेदी केंद्रांची चौकशी केल्यास आणखी मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :