एक्स्प्लोर

Bhandara Viral Video: भंडाऱ्यातील मंदिरात महादेवाचा नंदी पितोय दूध आणि पाणी; व्हायरल व्हिडिओमुळे मंदिरात नागरिकांची तुफान गर्दी

Bhandara Viral Video: भंडाऱ्यातील महादेव मंदिरातील नंदीचा दूध आणि पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Bhandara Viral Video: भंडारा (Bhandara) शहरासह जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील मंदिरातील (Temple) नंदी अचानक दूध आणि पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली आहे.  नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं ही दैवी चमत्कार सिद्ध करुन दाखवा असा दावा देखील केला आहे. तसेच हा दैवी चमत्कार सिद्ध करणाऱ्या 21 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे. 

भंडारा शहरालगत असलेल्या कृषी कॉलोनी येथील हनुमान मंदीरासह तुमसर आणि मोहाडी येथील मंदिरात ही घडली आहे. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा पसरली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या व्हिडीओवर अनेक प्रकराच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटत आहेत. या व्हिडीओला कोणी श्रद्धेचं नाव देत आहे तर कोणी अंधश्रद्धेचं नाव या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

नेमकं काय घडलं?

श्रावण महिन्याला आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे भंडाऱ्यातील  तुमसर आणि मोहाडी तालुक्यातही भाविकांची रेलचेल होती. तेव्हा काही भाविकांनी शंकराच्या पिंडीसमोर असणाऱ्या नंदीला चमाच्याने पाणी पाजले. तेव्हा नंदीनं ते पाणी पिल्याचा समज नागरिकांचा झाला. त्यानंतर हा एक दैवी चमत्कार असल्याचं काही जणांना वाटू लागलं. त्यामुळे अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. 

हा व्हिडीओ व्हायरल होताच आता दगडाचा नंदी दूध आणि पाणी पित असल्याच्या अफवा या जिल्ह्यात पसरू लागल्या आहेत. याच अफवांमुळे आता अनेक जणांनी हा चमत्कार पाहण्यासाठी मंदिरात झुंबड लावली आहे. नंदी दूध आणि पाणी पीत आहे, हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं जात आहे.  तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा दैवी चमत्कार असल्याचं सिद्ध करावं असं सांगण्यात येत आहे. 

 श्रावण मासारंभात भंडारा जिल्ह्यात ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ सुरु झाला आहे. यामध्ये अनेक भाविक विनाकारण भरडले जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा व्हिडीओवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर यासंदर्भात  अंधश्रद्धा निर्मुलन समिती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हे ही वाचा : 

काशीची गंगा विठुरायाला आणि विठूरायाची चंद्रभागा काशी विश्वेश्वराला अर्पण करणार, काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी पंढरपुरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget