काशीची गंगा विठुरायाला आणि विठूरायाची चंद्रभागा काशी विश्वेश्वराला अर्पण करणार, काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी पंढरपुरात
Pandharpur : वेळेवर पाऊस पडावा आणि अन्नदात्याला सुखी करावे असा आशीर्वाद विठुरायाकडे मागणार असल्याचे काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामींनी सांगितले.
सोलापूर: काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी हे काशीहून आणलेले गंगेचं पाणी चंद्रभागामध्ये अर्पण करणार असून चंद्रभागेचे पाणी काशीला गेल्यानंतर अर्पण करणार आहेत. देवाची नावे जरी वेगवेगळी असली तरी तो एकच असल्याचं ते म्हणाले.
हिंदू धर्मातील अतिशय श्रद्धेचे मानले जाणारे श्री श्री श्री 1008 काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज विठुरायाच्या नगरीत आगमन झाले. अधिक श्रावण मासानिमित्त महस्वामीजींचे तपोनुष्ठान पंढरपूरमध्ये होत आहे. काशी येथून आणलेली गंगा ते विठुरायाला अर्पण करणार असून येथील चंद्रभागा काशी विश्वेश्वराला अर्पण करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे माझाशी बोलताना सांगितले. यामुळे दोन महाक्षेत्रांचा श्रद्धाभाव लोकांच्या मनात असावा हीच भावना असल्याचे सांगितले. काशी विश्वनाथ जमिनीवर स्थापित आहेत तर विठुरायाच्या मस्तकी स्थापित आहे.
हरी हरा मध्ये कोणताही भेद नसून वाटताना ते शब्द दोन वाटले तरी शब्दधातू एकच असल्याचे काशी जगतगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले. दोघेही हुरू हरण करणारे म्हणजे पाप हरण करणारे असल्याचे महस्वामीजींनी सांगितले. भारत देश ही महासमन्वयक भूमी असून येथे देव देवतांची नावे जरी भिन्न असली तरी परमेश्वर एकाच असल्याचे सांगितले. वेळेवर पाऊस पडावा आणि अन्नदात्याला सुखी करावे असा आशीर्वाद विठुरायाकडे मागणार असल्याचे सांगितले .
मंगळवारी विठुरायाच्या दर्शनानंतर इष्टलिंग महापूजा होणार आहे. आपला संचारी अनुष्ठान असून पंढरपूर पासूनसुरु झालेले अनुष्ठान प्राईज ते काशीपर्यंत चालणार असल्याचे महस्वामीजींनी सांगितले. पंढरपूर येथे आज लिगैक्य सौ. सिंधू सुभाष म्हमाणे यांचे स्मृती प्रित्यर्थ हा सत्संग सोहळा आयोजित केला होता. आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यावेळी महास्वामींचे दर्शन आणि सत्संग ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजापैकी 30 पूजा बंद
दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास अर्थात पुरुषोत्तम यंदा 18 जुलै पासून 14 ऑगस्ट पर्यंत असणार असून एबीपी माझाच्या दणक्यानंतर रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पुजेपैकी 30 पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी वाढत गेल्यास उरलेल्या 15 पूजाही रद्द केल्या जातील असा निर्वाळा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिला. त्यामुळे आता जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाला लाभ घेता येणार आहे. या काळात रोज होणाऱ्या 10 पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय झाला होत. मात्र रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पुजेबाबत मात्र कोणताच निर्णय न झाल्याने भाविकांना दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार होते . याबाबत भाविकांच्या भावनांना ABP माझाने वाचा फोडल्यानंतर अखेर मंदिर समितीने रोज होणाऱ्या 45 पैकी 30 बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .
हा पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी असते. अशावेळी जास्तीतजास्त भाविकांना दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी भाविकांतून होत होती. आता मंदिराने रोजच्या 30 पूजा रद्द केल्याने भाविकांना दर्शनासाठी मिळणार वेळ वाढणार आहे. मंदिराचे उत्पन्न वाढवण्यासाठी समितीने दिवसातून तीन वेळा एकूण 45 तुळशी अर्चन पूजा सुरु केल्या आहेत. यामुळे मंदिराचे जरी उत्पन्न वाढत असले तरी भाविकांना मात्र दर्शन रांगेतील भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अधिक महिन्यासाठी रात्री होणाऱ्या 10 पाद्यपूजा मंदिर समितीने यापूर्वीच रद्द केल्या होत्या. आता 30 तुळशी अर्चन पूजाही रद्द केल्याने या महिनाभरात येणाऱ्या हजारो भाविकांना दर्शन सुलभ होणार आहे.
ही बातमी वाचा: