Bhandara Crime : लग्नाच्या जेवणात बीफची मेजवानी देणं महागात पडलं, पोलिसांनी नवरदेवासह 5 जणांना उचललं
Bhandara Crime : लग्नाच्या जेवणात बीफची मेजवाणी देणं महागात पडलं, पोलिसांनी नवरदेवासह 5 जणांना उचललं

Bhandara Crime : लग्नाच्या जेवणात बीफची मेजवाणी देणं भंडाऱ्यातील एका नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. हा प्रकार भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे घडलाय. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
गाईंची कत्तल केल्याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक
1) एजाज शहा (वय 21) - नवरदेव
2) शाकीर शेख (28)
3) मोशिन खान (21)
4) शरीफ शेख (30)
5) इझास निसार शहा (21)
हे सर्व पवनी येथील रहिवाशी आहेत.
पोलिसांनी नवरदेवाला अटक केल्याने खळबळ
अधिकची माहिती अशी की, लग्नाच्या मेजवानीसाठी तीन गाईंची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नवरदेवासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनीतून ही घटना समोर आली आहे. आज सायंकाळी होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना गाईंच्या मासांची मेजवानी देण्यासाठी तीन गाईंची निर्घृण कत्तल करण्यात आली होती. मात्र, पाहुण्यांना बीफची मेजवानी देणे नवरदेवाला चांगलचं महागात पडलंय. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई भंडाऱ्याच्या पवनी इथं आज करण्यात आली. गाय कत्तल प्रकरणी थेट नवरदेवालाचं अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
सैफ अली खान हल्लाप्रकरणामुळे लग्न मोडले, पण फैजानभाई मदतीला धावले; आकाशला पैसे दिले, लग्नाचा खर्चही उचललाhttps://t.co/HjAiWXBSic#aakashkanojia #maharashtra #saifalikhan
— ABP माझा (@abpmajhatv) January 30, 2025
Metro construction collapses : मोठी बातमी : चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग राहिवासी सोसायटीवर कोसळला Videohttps://t.co/00TbN4owMg
— ABP माझा (@abpmajhatv) January 30, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
