Bhandara Factory Explosion : ऑर्डनन्स फॅक्टरीच्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांच्या मागण्या मान्य; महाप्रबंधकांकडून आश्वासन
Bhandara : ऑर्डिनन्स फॅक्टरीतील मृताकांच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन आयुध निर्माणी महाप्रबंधकांनी आंदोलकर्त्याना दिले आहे.
Bhandara Factory Explosion : भंडारा शहरातील जवाहरनगरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काल(24 जानेवारीला) झालेल्या दुर्घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला. या मृताकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि आयुध निर्मणीत नोकरी मिळावी या मागणीला घेऊन सकाळपासून संतप्त कुटुंबियांनी आयुध निर्मानीच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केल. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole), आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी आयुध निर्मनीचे महाप्रबंधकांसोबत चर्चा केली. यावेळी मृताकांच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन आयुध निर्माणी महाप्रबंधकांनी आंदोलकर्त्याना दिले आहे.
संतप्त ग्रामस्थ आणि आयुध निर्माणीच्या कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की
भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटातील कामगारांचे मृतदेह घेऊन साहुली येथील ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांनी आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या सुरू केला होता. दरम्यान, मृतदेह आल्यानंतर आयुध निर्माणीचे महाप्रबंधक आणि वरिष्ठ अधिकारी ज्यावेळी मृतदेहाजवळ पोहोचले त्यावेळी संतप्त ग्रामस्थ आणि आयुध निर्मानीच्या कर्मचार्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीमध्ये आयुध निर्माणीच्या अधिकाऱ्यांना पोलीस सुरक्षा व्यवस्थेत कार्यालयाकडे नेण्यात आले.
शहिदांना जो सन्मान मिळतो तोच सन्मान मृतकांना मिळावा- नरेंद्र भोंडेकर
ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात आता पर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झालाय, तर 5 कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामवासी आणि आयुध निर्माणी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज आयुध निर्माणच्या मुख्य प्रवेशादारावर सकाळपासून आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनस्थळी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त कुटुंबियांना न्याय मिळवून देवू, असं आश्वासन भोंडेकर यांनी दिलं. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाला ज्या प्रमाणे शहिदाचा दर्जा देण्यात येतो, तसाच दर्जा आयुध निर्माणीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना देवून त्यांना शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ द्यावा, अशी प्रतिक्रिया देत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागणी केली आहे.
आयुध निर्माणी येथे झालेल्या मृतांचा व जखमींचा यांचा तपशील
मृत
चंद्रशेखर गोस्वामी 59 वर्षे
मनोज मेश्राम 55 वर्षे
अजय नागदेवे 51 वर्षे
अंकित बारई 20 वर्षे
लक्ष्मण केलवडे वय अंदाजे 38
अभिषेक चौरसिया वय 35
धर्मा रंगारी वय 35 वर्ष
संजय कारेमोरे 32
जखमींची नावे
एन पी वंजारी 55 वर्षे
संजय राऊत 51 वर्ष
राजेश बडवाईक 33 वर्षे
सुनील कुमार यादव 24 वर्षे
जयदीप बॅनर्जी 42 वर्षे
हे ही वाचा