Walmik Karad : वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल? किती गुन्ह्यातून दोषमुक्त झाला? कराडची गुन्हेगारी 'कुंडली' समोर
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडवर अवादा पवनचक्की खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासह इतर तीन प्रकरणे ही न्यायप्रविष्ठ आहेत.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित पवनचक्की कंपनी खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या वाल्मिक कराडवर या आधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक कराडवर या आधी 15 गुन्हे दाखल आहे. यापैकी 8 गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर खंडणीसह इतर 4 प्रकरणे ही न्यायप्रविष्ठ आहेत.
वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्यरित्या व्हायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही केल्याचं दिसून आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे वाल्मिक कराडशी संबंधित आहेत. त्यांच्यावरही या आधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.
वाल्मिक कराडवर दाखल झालेले गुन्हे
1) परळी शहर पोलिस ठाण्यात 1999 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
2) परळी शहर पोलिस ठाण्यात 2001 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
3) परळी शहर पोलिस ठाण्यात 2001 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
4) परळी शहर पोलिस ठाण्यात 2002 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
5) परळी शहर पोलिस ठाण्यात 2006 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
6) परळी शहर पोलिस ठाण्यात 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
7) अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात 2002 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
8) दिंद्रुड पोलिस ठाण्यात 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तत्ता.
- बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019 ला दाखल गुन्ह्यात आरोपी विरुद्ध पुरावा न मिळाल्याने दोषारोपपत्र दाखल नाही.
- बर्दापूर पोलीस ठाण्यात 2015 ला दाखल गुन्ह्यात दोषारोपामधून मुक्तता.
- परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 ला दाखल गुन्ह्यात नाव कमी करण्यात आले आहे.
- तर वाल्मिक कराडच्या विरोधात पवनचक्की खंडणी प्रकरणासह अन्य 3 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.
ही बातमी वाचा: