एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला, थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्टर, बीडमध्ये चर्चा

Village for Sale : पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला असल्याचे बॅनर लावले आहे.

बीड : गावात आधीच मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यात आलेल्या योजना कागदोपत्री दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीड (Beed) जिल्ह्यात समोर आला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला असल्याचे बॅनर लावले आहे. तर, गावात कोणत्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नावाने बॅनर लावत गाव विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. एकूण 1800 लोकसंख्या असलेल्या या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तर, गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हा भरात चर्चा सुरू आहे.

पाटोदा तालुक्यातील खडकवाडी येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या एका भुमिकेमुळे या गावाची बीड जिल्ह्यात चर्चा पाहायला मिळत आहे. गावात करण्यात येणाऱ्या विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने, या भ्रष्टाचाराला कंटाळून ‘गाव विकणे आहे’ असा फलक गावकऱ्यांनी लावला आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे यासाठी परवानगी देण्याची विंनती देखील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या मागणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार...

खडकवाडी गावात जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्तीतील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी गेल्यावर्षी 4 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, सिमेंट रस्ता न करताच सरपंच व सरपंच पती यांनी ग्रामसेवकावर राजकीय दबाव टाकत अपहार केला. त्यामुळे, नागरिक निधी मिळून देखील सोय सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच, अजून पैसे कमी पडत असतील तर खडकवाडी गाव विकून ग्रामपंचायतीला पैसे द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

काय लिहले आहे पत्रात...

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब...
सप्रेम नमस्कार,
आपण राज्याला दिलेल्या अनेक महत्त्वकांशी योजना घेऊन महाराष्ट्र राज्य सध्या विकासाच्या वाटचालीकडे आहे. मात्र, पाटोदा तालुक्यातील खडकवाडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे. गावात आलेल्या आपल्या सर्व विकासाच्या योजना कागदोपत्रीच राबवल्या गेल्या असून, सर्व निधी परस्पर उचलण्यात आला आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाला तक्रार देऊन देखील कसलीच कारवाई झाली नाही. गावात मूलभूत सोयी सुविधांचा अद्याप अभाव आहे. त्यामुळे आमचे गाव विकणे आहे. कृपया आमचे गाव विकण्यास अनुमती द्यावी ही विनंती....

गावकऱ्यांची प्रतिक्रिया...

शासनाच्या ज्या काही योजना आहे, त्या परिपूर्ण राबवल्या जात नाही. या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्तीसाठी चार लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, सरपंचाने काम न करता यातील तीन लाख 36 हजार रुपये बोगसगिरी करत उचलले आहेत. त्यामुळे ज्या वस्तीचा विकास व्हायला पाहिजे होता, ती वस्ती विकासापासून वंचित राहिली आहे. त्यामुळेच आम्ही आमचं गाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गाव विकण्याची परवानगी देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही केली असल्याचं गावकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत..; कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी काढले चक्क अवयव विक्रीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget