Trupti Desai : बीडमध्ये गुंडाराज नव्हे तर तिथले राजकारणीच गुंड; पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकण्यापूर्वी तृप्ती देसाईंचा हल्लाबोल; 'त्या' 26 अधिकाऱ्यांबाबत पुरावे सादर करणार
Trupti Desai : वाल्मिक कराडशी जवळीक असलेल्या बीडमधील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी आज तृप्ती देसाई पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करणार आहेत.

Trupti Desai : बीड जिल्ह्यातील 6 अधिकारी आणि 20 कर्मचाऱ्यांची वाल्मिक कराडशी (Walmik Karad) जवळीक होती, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी तक्रार केली होती. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याच अनुषंगाने तृप्ती देसाई यांना आज सकाळी साडेअकरा वाजता पुराव्यानिशी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. त्यामुळे तृप्ती देसाई अकरा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) वाल्मिक कराडचा सहभाग आढळला आहे. त्यानंतर कराडसोबत अनेक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 26 जणांच्या नावासह यादी आणि तक्रार दिली होती. त्याप्रमाणे बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची नियुक्ती केली. त्यांनी अगोदर आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे 6 मार्च रोजी जबाब घेतले. आता तक्रारदार देसाई यांना आज बीडमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
तृप्ती देसाई देणार बीड पोलिसांच्या नोटीसीला उत्तर
त्यामुळे तृप्ती देसाई आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार आहेत. 27 जानेवारीला मी बीड जिल्ह्यातील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची यादी दिली होती. वाल्मिक कराडशी संबंधित ती लोकं आहेत. त्यानंतर बीड पोलिसांनी मला नोटीस दिली होती. आज मी नोटीसचे उत्तर देणार आहे. बीड पोलिसांना भेटून सर्व पुरावे सादर करणार असल्याची माहिती तृप्ती देसाई यांनी देईल दिली आहे.
बीडमध्ये गुंडाराज नाही तर तिथले राजकारणीच गुंड
तृप्ती देसाई यांनी बीडमधील गुंडाराजवरून जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, वाल्मिक कराड कुठे लपला? का लपला? याचे पुरावे आणि माहिती मी दिली. बीडमधील गुंडाराज सर्वत्र आहे. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट दिल्यानंतर मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडाराज समोर आला आहे. बीडमध्ये गुंडाराज आहे असं म्हणण्यापेक्षा बीडचे राजकारणीच गुंड आहेत, असं म्हणणं जास्त संयुक्त ठरेल. धनंजय मुंडे आणि त्यांची टोळी, सुरेश धस आणि त्यांची टोळी, संदीप क्षीरसागर यांचे व्हायरल कॉल रेकॉर्डिंग, असं पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की, बीडमध्ये गुंडाराज नाही तर इथले राजकारणीच गुंड आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

