एक्स्प्लोर

फरार आरोपींना पळून जाण्यासाठी वायबसेसह पत्नीनंही पैसे पुरवले? SIT कडून रात्रभर कसून चौकशी, संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट

फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी उचलेल्या दोघांची STI कडून कसून चौकशी सुरु आहे. यात हत्याप्रकरणात आरोपींना पळून जाण्यास डॉ वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Santosh Deshmukh Case Update: सरपंच संतोष देशमुख प्रकरणानं राज्यातील वातावरण तापलं आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) शरणागतीनंतर हत्याप्रकरणातील तीन फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीचा जोर वाढला आहे. दरम्यान हत्याप्रकरणातील फरार आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत तिघांना पोलिसांनी उचचल्यानंतर या प्रकरणात एसटीआयने (SIT investigation) रात्री उशीरापर्यंत यातील दोघांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये डॉ.संभाजी वायबसे व त्याच्या वकील पत्नी समावेश आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरविल्याचा संशय आहे.  डॉक्टर वायबसे हे ऊसतोड कामगारांचे मुकादम म्हणून काम पाहतात.  दरम्यान, डॉक्टर दांपत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी चालू आहे. ही चौकशी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार होते. त्यांना नुकतीच अटक  करण्यात आली आहे.

एसआटीकडून आरोपींची कसून चौकशी

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख आरोपींना पळून जाण्यास येथील डॉ. वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक डॉ. संभाजी वायबसे हे आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीना पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा संशय त्यांच्यावर आहे. वायबसे यांची एसआयटीकडून चौकशी सुरू असून चौकशीनंतर आणखी माहिती हाती येईल. दरम्यान, बीड हत्याप्रकरणात राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या तपासावर विशेष लक्ष देत फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. तसेच, हा खटला न्यायालयात फास्टट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी हा खटला लढावा, यासाठी त्यांच्यासोबत फोनवरही संपर्क साधला आहे.

वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी

दुसरीकडे या घटनेचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. वाल्मिक हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर, त्यास न्यायालयात हजर केले असता, केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वाल्मिक कराड सध्या बीडमधील तुरुंगात असून त्याच्याकडून अनेक घटनांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. सीआयडीचे तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आलेल्या एसयआटीकडून हा तपास होत आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरत असून बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर, परभणीही लोकं रस्त्यावर उतरले आहेत. तसेच, 5 जानेवारी रोजी पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघणार असून सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. 

हेही वाचा:

Santsh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; पुण्यातून सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला केलं अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Meet Satish Bhosle Family : आमदरा सुरेश धस यांनी घेतली सतीश भोसलेच्या कुटुंबीयांची भेटABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 16 March 2025Teacher Death News : फेसबूक पोस्ट करुन शिक्षकाने जीवन संपवलं, १८ वर्ष काम करुनही पगार न दिल्यानं उचललं टोकाचं पाऊलMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 16 March  2025 : 4 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
बीडमधील शिक्षक नागरगोजे यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे सरसावल्या; 'गुरुजी'प्रश्नी शासनाला दाखवला आरसा
Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Embed widget