एक्स्प्लोर

मोठी बातमी! कुंडलिक खांडेंच्या कथित ऑडिओ प्रकरणाच्या निषेधार्थ आज 'शिरूर बंद'

Kundalik Khade Viral Audio Clip : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याच्याच निषेधार्थ आज शिरुर बंदची हाक देण्यात आली आहे.

Beed Kundalik Khade Viral Audio Clip : बीड : शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप मागच्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि याचा परिणामसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतोय आज कुंडली खांडे यांच्या या ऑडिओ क्लिपच्या निषेधार्थ शिरूर शहर बंद ठेवला आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात अपशब्द काढणाऱ्या कुंडलिक खांडे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी झाली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटल्याचं पाहायला मिळालं. बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली  कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. दरम्यान निवडणूक निकालापूर्वी झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. तर एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खांडेंच्या ऑफिसवर हल्ला 

खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली होती. बीड शहरातील जालना रोडवरील खांडेंच्या ऑफिसवर हल्ला करण्यात आला होता. 

कुंडलिक खांडे यांना अटक 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेना अटक करण्यात आली आहे. 2 महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडेना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एका कार्यकर्त्याची कुंडलिक खांडे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यामध्ये निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाचा संवाद आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

प्रकरण काय? 

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली  कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar Bag Checking : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचया बॅगची प्रशासनाकडून तपासणीAvinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्यManda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Embed widget