Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्याचे पाय खोलात,वन्यप्राण्यांच्या शिकारीचा नाद भोवला; पोलिसांनी उचलताच वनविभागाची मोठी कारवाई
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्याचे पाय खोलात,वन्यप्राण्यांच्या शिकारीचा नाद भोवला; पोलिसांनी उचलताच वनविभागाची मोठी कारवाई

Satish Bhosale, Beed : बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतिश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी आज (दि.12) प्रयागराजमधून अटक केली. त्यानंतर सतीश भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. हरिण, मोर, ससा आणि इतर काही वन्य प्राण्याच्या शिकारी केल्याप्रकरणी आणि वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केल्या प्रकरणी सतीश भोसलेवर वनविभागाकडून मोठा कारवाई करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. 15 ते 20 दिवसात सतीश उर्फ खोक्या भोसलेवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयागराज मधून त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे त्यातच आता वन विभागाने सतीश उर्फ खोक्या भोसले वर ॲक्शन घेतली आहे. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडी केली असता शिकारी साठी लागणाऱ्या काही वस्तू व वाळलेल्या प्राण्याचे मास आढळले होते. त्या आधारे वन विभागाने ( WPA ) वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सतीश उर्फ खोक्या भोसले वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून राहतो या विरोधात सुद्धा वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सतीश भोसलेला नोटीस पाठवली आहे. आता पुढील सात दिवसात वनविभागाच्या जागेवरचा मालकी हक्क दावा सिद्ध करणे गरजेचे आहे अन्यथा वन विभाग पुढील अतिक्रमण काढून घेण्याबाबत कारवाई करण्याची शक्यता आहे.
- वनविभागाच्या वतीने सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात दोन गुन्हे दाखल.
- वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल.
- आठ मार्च रोजी वनविभागाने केलेल्या झाडाझडती आढळून आलेल्या वस्तू व वाळलेल्या मासाच्या आधारे गुन्हा दाखल.
- वन वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले वर दुसरा गुन्हा दाखल करून दिली नोटीस
- अतिक्रमण प्रकरणात सात दिवसात मालकी हक्क दावा दाखल करण्याची सतीश भोसलेला देण्यात आली आहे मुद्दत.
- सात दिवसात मालकी हक्क दावा सिद्ध न केल्यास वन विभाग पुढील कारवाई करून अतिक्रमण काढण्याची शक्यता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























