एक्स्प्लोर

Sandeep Kshirsagar : बीड जाळपोळीवर संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसांवर केले गंभीर आरोप; पाहा नेमकं काय म्हणाले

Sandeep Kshirsagar : पहिल्यांदाच्या बीडच्या जाळपोळीच्या घटनेवर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रीया आली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी बीड पोलिसांवर (Beed Police) काही गंभीर आरोप केले आहे. 

बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange)यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरु असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील (Beed) आंदोलक आक्रमक झाले होते. ज्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या राहत्या घरात आणि राष्ट्रवादी भवनात देखील आग लावण्यात आली होती.  या घटनेनंतर राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले होते. मात्र, या सर्व घटनेवर माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचं संदीप क्षीरसागर यांनी टाळले होते. परंतु, आज पहिल्यांदाच्या बीडच्या जाळपोळीच्या घटनेवर त्यांची प्रतिक्रीया आली आहे. यावेळी बोलतांना संदीप क्षीरसागर यांनी बीड पोलिसांवर (Beed Police) काही गंभीर आरोप केले आहे. 

बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराच देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभा असलेल्या आठ गाड्या जमावाने पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर, संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "ज्या लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली ते मराठा आंदोलक नव्हते. जे काही समाजकंटक होते, त्यांचा सूत्रधार पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. बीडमध्ये घडलेल्या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. मात्र, तरी देखील पोलीस मुख्य सूत्रधारावर का कारवाई करत नाहीत. तर, आगामी अधिवेशनामध्ये देखील यावर आवाज उठवणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. 

जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करणार...

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असतानाच बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. यामध्ये शरद पवार गटाचे राष्ट्रवादी भवनात घुसून जमावाने मोठी तोडफोड केली होती. तसेच, राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीला आग लावली. यामध्ये इमारतीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तर, सध्या या इमारतीमध्ये डागडुजीचे काम सुरू आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी याच इमारतीची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावेळी, यंदाचा दिवाळी पाडवा याच राष्ट्रवादी भवनमध्ये आपल्या कुटुंबासह साजरा करणार असल्याची माहिती बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली होती. त्यामुळे जळालेल्या कार्यालयात यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोन युवा आमदारांनी घेतला आहे. यावेळी सोबत या दोघांचे परिवारही असणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

बीडमधील जाळपोळ हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता, जाळपोळ करणारे तरूण जिल्ह्याबाहेरचे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget