बीडमधील जाळपोळ हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता, जाळपोळ करणारे तरूण जिल्ह्याबाहेरचे
Beed Maratha Reservation Protest : बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 99 तरुणांना अटक करण्यात आलीय त्यात अनेक तरुण बिगरमराठा आहे.
बीड : बीडमधील (Beed Maratha Reservation Protest) जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता समोर येत आहे. जाळपोळ पूर्वनियोजित असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ही शक्यता वर्तवली आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण 25 वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जाळपोळीचा प्रकार मराठा समाज किंवा स्थानिकांनी केला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता.
बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी तरुण 25 वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 99 तरुणांना अटक करण्यात आलीय त्यात अनेक तरुण बिगरमराठा आहे. बीड शहरात अटक करण्यात आलेल्या 42 तरुणापैकी 10 पेक्षा जास्त तरुण बिगर मराठा आहे. तसेच यामध्ये शिक्षण घेणा-या तरुणांचा मोठा गट आहे. या संदर्भातील अधिक तपास पोलीस करत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बीड आणि माजलगावमध्ये जमावाने जी जाळपोळ केली आहे. यामध्ये सर्वाधिक तरुण शिकलेली मुले असून अशा जमावामध्ये तरुण मुलांनी कायदा हातात घेऊन आपलं करिअर बरबाद करू नये असं मत औरंगाबाद परिक्षेत्राचे पाहिजे डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. जाळपोळी प्रकरणी आतापर्यंत 99 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सुद्धा आय जी चव्हाण यांनी दिली आहे. माजलगावमध्ये आणि बीडमध्ये जाळपोळीची घटना घडल्यानंतर मागच्या दोन दिवसापासून आयोजित ज्ञानेश्वर चव्हाण हे बीडमध्येच तळ ठोकून पोलीस ही जाळपोळ कोणी केली याचा कसून शोध घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा आय जी चव्हाण यांनी केली आहे.
बीडमध्ये तणावाचे वातावरण
मनोज जरांगे जालन्यात उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रभर रस्तोरस्ती आंदोलनाचा वणवा पेटलाय. रास्तारोको, एसटीची तोडफोड अशा मार्गाने या आंदोलनाचा रस्ता आता नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला. बीडमध्ये संतप्त जमावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली आहे. बीडमध्ये सुरू असलेल्या 'या' जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याआधी मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयाला आग लावली. आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.