एक्स्प्लोर

Pankaja Munde: आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय? पंकजा मुंडेंकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा

Pankaja Munde: दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे जोरदार भाषण. पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा

बीड: तुम्ही निवडणुकीत मला जिंकवलत तेव्हा इज्जत दिली. माझा पराभव झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त इज्जत दिली. आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी मी  प्रत्येक गावागावात, कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय, असे वक्तव्य भाजपच्या विधानपरिषदेतील आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. त्या शनिवारी भगवान भक्तीगडावर (Bhagwangad) आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dussehra Melava 2024) बोलत होत्या.

यावेळी पंकजा मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. आपला कार्यक्रम हा अठरापगड जातीच्या लोकांचा कार्यक्रम आहे. आपला कार्यक्रम ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव लिहणाऱ्यांचा आहे. मतदान केल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असेही पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले. 

जातीपातीच्या राजकारणावरुन पंकजा मुंडे संतापल्या

मी साताऱ्याला गेले होते. तेव्हा उदयनराजे भोसले यांनी मला घरात नेलं आणि माझ्या हाताने आरती केली, तेव्हा त्यांच्या वडिलांच्या बाजूला गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता. मात्र, आज राज्यात काय स्थिती आहे? अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. एखाद्याच्या गाडीचा अपघात झाला तर चालकाचे जात विचारली जाते. चिमुकलीवर अत्याचार झाल्यास त्याची जात विचार जात विचारली जाते. ही वेळ पाहण्यासाठी आयुष्यातील 22 वर्षे घालवली का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.

पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमानचं लाँचिंग

यावेळी पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची ओळख उपस्थितांना करुन दिली. पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले आणि त्याची ओळख करुन देताना म्हटले की, हा माझा मुलगा आर्यमान, भगवान बाबांच्या दर्शनाला आलाय. मी माझ्या मुलाला सांगितलं  की, मला तुझ्यापेक्षा ही जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये जमा केले. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मीदेखील तुमच्यावर पोटच्या लेकरापेक्षा जास्त माया करते की नाही? तुम्ही घरच्यांपेक्षा जास्त जीव मला लावता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुलगा आर्यमानला व्यासपीठावर आणल्याने आगामी काळात त्याचे राजकारणात लाँचिंग होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा

पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीलाABP Majha Headlines : 5 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Shiv Sena Dasara Melava 2024 : आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारीSayaji Shinde EXCLUSIVE : आधी शरद पवारांनी बोलावलं असतं तर तिकडे गेलो असतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
Pankaja Munde: छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
छत्रपती घराण्याचं गोपीनाथ मुंडेंवर प्रेम; उदयनराजेंच्या घरात पाहिलेल्या 'त्या' फोटोचा पंकजा मुंडेंनी सांगितला किस्सा!
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिलाय; राष्ट्रवादी प्रवेशावर सुषमा अंधारेंची टीका, आता अभिनेत्याचा पलटवार
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
युवकांसाठी मोठी बातमी! 'या' योजनेअंतर्गत देशात 90000 रोजगाराच्या संधी, काय आहे पात्रता?
Embed widget