देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय थांबणार नाही, भाजपचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मी थांबणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.
Manoj Jarange Patil : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. तर देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय मी थांबणार नसल्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. बीडच्या वडवणीमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. ते व्हिडिओ ते एडिट करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
फडणवीसांचा मला संपवण्याचा डाव
मला मराठ्यांपासून लांब करण्यासाठी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझी पोलीस सुरक्षा कमी करुन देवेंद्र फडवणीस आणि भाजप मला संपवण्याचा डाव टाकत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं, की सहा कोटी मराठा ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही
दरम्यान, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मी आता थांबणार नाही, मेलो तरी हरकत नाही मात्र आरक्षण घेणारच असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीडच्या वडवणीमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील एकही खासदार आणि विधानसभेचे सदस्य आता मी निवडून येऊ देणार नाही. मराठ्यांनी आता निश्चय केला पाहिजे की यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.
जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटेंच्या गाडीचा तोडफोड
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीची दुसऱ्यांदा तोडफोड करण्यात आलीय. वाडवणीत जारांगे पाटलांची सभा सुरु असताना अज्ञातांना गाडीची तोडफोड केली आहे. रात्री सहा वाजण्याच्या वेळी वडवणीमध्ये मनोज जरांगे यांची सभा सुरु होती. या सभेला गंगाधर कुठे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपली गाडी पार्किंगमध्ये उभी केली असता अज्ञातांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केल आहे.यापूर्वी देखील गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर वडीगोद्री या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता. हल्ला करणारे आरोपी अद्याप देखील पोलिसांनी पकडले नसून पुन्हा एकदा वडवणीमध्ये त्यांच्या गाडीची तोडफोड केलीय.
दरम्यान, या घटनेनंतर गंगाधर काळकुटे यांनी तत्काळ पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संदर्भात तक्रार करणार असल्याचे सांगितले. कितीही हल्ले झाले तरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लढणार असल्याचं काळकुटे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा