एक्स्प्लोर

तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

Manoj Jarange : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. 

Manoj Jarange On Devendra Fadnavis : मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जातेय, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्तेचा वापर करुन पुन्हा काही केलं, तर एकत्र यावं लागेल, असं थेट आव्हानंही मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केलं आहे. 

मंगळवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे समाज एकवटला आहे. त्यांना आता सुट्टी देणार नाही. तसेच, येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करणार असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 

फडणवीसांना सुट्टी नाही, समाज एकवटलाय : मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलताना म्हणाले की, मी समाजाचा माणूस आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर यांचा माणूस आहे, असे आरोप माझ्यावर सातत्यानं होत आहेत. मात्र, मी फक्त समाजाचा आहे. मी कोणाचं ऐकत नसतो. शरद पवार जर आरक्षणाच्या विरोधात बोलले, तर उद्यापासून मी त्यांचाही विरोध करेल. देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमुळे समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यांच्यासाठी हे आता जड जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. 

तुम्ही एसआयटी चौकशी सुरू केली आहे. काय चुकलं आमचं? तुमच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच, एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा होऊन आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र तुम्ही सतत याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भूमिका घेता असं का? यावर बोलताना जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मी कधी ही भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. ट्रॅप रचला. म्हणून त्यांना विरोध आहे. 

शरद पवार मराठा आरक्षणाविरोधात बोलले, तर त्यांच्याही विरोधात बोलणार : मनोज जरांगे 

तुम्ही शरद पवार यांचे माणूस आहे असा आरोप होत असतो याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, शरद पवार उद्या जर मराठा आरक्षणाविरोधात बोलले तर त्यांच्याही विरोधात बोलीन मी. ही संवाद बैठक आहे. लोक एकत्र झाले आहेत. आता त्याचा राजकीय फटका सगळ्यांना बसेल, असं मनोज जरांगे म्हणाले. मला गरज नाही पोलिसांची माझी जात सज्ज आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान, मराठा आमदार मंत्री हे पक्षाचे काम करतायत. जातीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का नाही? हे पहाणार आहे समाज. हजारो लोक लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यात येत आहे, हा समाजाचा विषय तो माझा नाही. त्यांना अधिकार आहे. पाच पन्नास लोक उभे राहतील, त्यांचं भविष्य त्यांच्या हातात आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget