Gautami Patil: '...तू होती का माझी परी'; गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल
Beed News : सध्या सोशल मीडियावर या तरुणाची आणि त्याच्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे.
Beed News : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असताना, बीडच्या एका तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली आहे. "गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी, पण तु होती का माझी परी" असे म्हणत या तरुणाने तिला थेट पत्र लिहले आहे. रोहन दादा गलांडे (पाटील) असे पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर या तरुणाची आणि त्याच्या पत्राची जोरदार चर्चा सुरु आहे.
एका मुलाखतीत बोलताना गौतमी पाटील म्हणाली होती की, “आता मी 25 वर्षांची आहे. लग्न करून घरसंसर थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे, असल्याचं गौतमी पाटील म्हणाले होती. त्यानंतर आता तिला बीडच्या तरुणाने लग्नाची मागणी घातली आहे.
तरुणाच लग्नसाठी मागणी घालणारे पत्र...
प्रिय,
“गौतमी पाटील तु भारी, तुझ्या घरी पन तु होती का माझी परी, मी रोहन दादा गलांडे (पाटील) तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती की, "आता मी 25 वर्षाची आहे. लग्न करुन घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्या आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यावसाय आहे. तु जर माझ् यासोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ऐ पत्ता मु. पो. चिंचोली (माळी), ता. केज, जि. बीड, पीन कोड 431123 मोबाईल नंबर **********. या पत्यावर तु मला भेटायला ये मी तुझ्या सोबत लग्न करायला मी तयार आहे.
बीड जिल्ह्यातील तरुणाने गौतमी पाटीलला पत्र लिहून लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे आता या तरुणाच्या मागणीवर गौतमी पाटील काय प्रतिकिया देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर गौतमीने लग्नाची भावना बोलावून दाखवल्यावर तिला थेट लग्नाची मागणी घालणारा कोणीतरी पहिल्यांदाच समोर आल्याने याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..."