Dhananjay Munde: 'तेव्हा आपल्या लोकप्रतिनिधी काय करत होत्या,' धनंजय मुंडेंची प्रतीम मुंडेंवर टीका
Beed: शंभर दोनशे कोटी आणणे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आत्ताच 130 कोटी मंजूर केले: धनंजय मुंडे
Beed News: विकास निधीच्या श्रेयवादातून मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे (Dhananjaya Munde) यांनी खासदार प्रीतम मुंडे (Pratim Munde) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. परळीचे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असतानाही या ज्योतिर्लिंगासाठी केंद्र सरकारकडून एक रुपयाचा ही निधी येऊ शकला नाही. हे इथल्या लोकप्रतिनिधीचे अपयश आहे, असे म्हणत धनंजय यांनी प्रतीम मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
परळी शहरातील विद्यानगर भागात नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलतांना आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा प्रतीम मुंडे याचं नाव न घेता टीका केली आहे. केंद्र सरकारच्या निधी मंजूर करून आणण्यात बीडच्या खासदार कशा अपयशी ठरल्या आहेत अशी टीका मुंडे यांनी केली आहे. तसेच ज्यांच्याकडे केंद्राची जवाबदारी आहे. जे देशाच्या सार्वभौम सभागृहात आपल्या भागाचं नेतृत्व करत आहे, त्या व्यक्तीने सुद्धा सार्वभौम सभागृहात ठासून सांगण्याची गरज आहे की, हो परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हेच देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे हे सांगावे लागेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या छत्तीसगडच्या ज्योतिर्लिंगला केंद्र सरकार सोळाशे कोटी रुपये देतो, त्यावेळी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी काय करत होते. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा विसर जाणीवपूर्वक जर कुणी करत असेल आणि तिकडे निधी देऊन त्या ज्योतिर्लिंगाला मोठ करत असतील तर हे आव्हान देखील मी माझ्या खांद्यावर घेतो. शंभर दोनशे कोटी आणणे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आत्ताच 130 कोटी मंजूर केले. सरकारमध्ये कुणीही मंत्री आणि मुख्यमंत्री असले तरी निधी आणण्याची ताकद निर्माण केली असल्याच मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी