Beed News: बैलगाडीखाली पडून ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
Beed News : ऊसतोड मजुराच्या मुलीचा उसाने भरलेल्या बैलगाडीतून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Beed News : बैलगाडीखाली पडून बीड जिल्ह्यातील (Beed District) ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंग येथील ऊसतोड मजुराच्या मुलीचा उसाने भरलेल्या बैलगाडीतून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात हे. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Cooperative Sugar Factory) परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. देवयानी भाऊसाहेब गायकवाड (वय 9 वर्षे) असे मृत मुलीचे नाव असून, ऊस तोडणीच्या निमित्ताने ती कुटुंबातील सदस्यांसोबत सातारा जिल्ह्यातील कराड येथे गेली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरसिंग येथील भाऊसाहेब गायकवाड हे गेल्या दहा वर्षांपासून आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी ऊसतोडीचे काम करीत आहेत. दरम्यान यावर्षी ऊसतोडीचे काम करण्यासाठी ते कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर गेले होते. या कारखान्यावर तीन महिन्यांपासून ते बैलगाडीवरून ऊसतोडणीचे काम होते.
तोल जाऊन खाली पडल्याने टायरखाली आली...
तर 10 मार्च रोजी सकाळी ते ऊसतोडणीसाठी गेले. यावेळी सोबत त्यांची मुलगी देवयानी देखील होती. दरम्यान बैलगाडी भरल्यानंतर त्यांची मुलगी देवयानी ही गाडीवर बसली होती. मात्र चालू गाडीत तिचा तोल जाऊन ती खाली पडल्याने टायरखाली आली. या दुर्दैवी घटनेत देवयानीचा मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी तिला तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शनिवारी तिच्यावर हिवरसिंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देवयानी हिवरसिंगा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. मात्र आजीचे निधन झाल्याने वडील देवयानीला सोबत घेऊन गेले होते.
कामगाराने कानाला हेडफोन लावून केली आत्महत्या
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत बीड शहरात एका कामगाराने कानाला हेडफोन लावून त्यानंतर बेल्टने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बीड शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातील नवीन इमारतीमध्ये रविवारी (12 मार्च) सकाळी उघडकीस आली आहे. तर मयत हा या ठिकाणी सुरु असलेल्या कामावर मजुरी करत होता. सुरज ललन यादव असे या मजुराचे नाव आहे. बीड जिल्हा रुग्णालय परिसरात नवीन इमारतीचे काम सुरु आहे. तर सुरज हा मजुरीसाठी सात दिवसांपूर्वी आला होता. तो डोअर पॉलिशचे काम करत होता. मात्र त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अजूनही कळू शकले नाहीत. पोलिसांनी याबाबत त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली असून,पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : प्रेयसीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, बीडच्या सत्र न्यायालयाचा निकाल