Beed News: अंबाजोगाईकडे जाणारी एसटी बस बुटेनाथ घाटात पलटली; घटनास्थळी मदतकार्य सुरू
Bead Accident : घटनास्थळी पोलिसांसह परिसरातील नागरिकांकडून मदतकार्य करण्यात येत आहे.
Beed Accident : बीडच्या (Beed) अंबाजोगाईकडे जाणारी एक एसटी बस अंबाजोगाईपासून जवळ असलेल्या बुटेनाथ परिसरातील घाटात पलटी झाली आहे. या बसमध्ये वीसपेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात 20 ते 25 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ 'स्वाराती' रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर घटनास्थळी पोलिसांसह परिसरातील नागरिकांकडून मदतकार्य करण्यात येत आहे.
अंबाजोगाईपासून जवळ असलेल्या बुटेनाथ परिसरातील घाटात एसटी बस पलटी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर परिसरात नागरिकांनी देखील मदतकार्य करत अपघातात जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. या अपघातात 20 ते 25 जण जखमी असल्याची माहिती समोर येत असून, 5 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर सर्वच जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. मात्र अचानक बस कशी पलटी झाली किंवा अपघात कशामुळे झाला याबाबत आणखी कोणतेही माहिती समोर आलेली नाही.